रितेश देशमुखच्या नव्या फोटोशूटची होतेय सोशल मीडियावर तूफान चर्चा, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ‘आपला हात भारी…. सगळंच लय भारी’ या डायलॉगने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलेला बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख समाज माध्यमात खूप सक्रिय असतो. त्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो.

अलीकडेच रितेशने नवीन फोटोशूट केले असून त्याने हे फोटो समाज माध्यमात शेअर केले आहेत.

रितेशच्या या नव्या फोटोंची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

रितेशच्या या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून रितेशने त्याच्या अभिनयाची सुरुवात केली होती. त्यामध्ये त्याची हिरोईन जेनेलिया होती.

याच सिनेमाच्या निमित्ताने रितेश व जेनेलिया दोघे एकत्र आले. त्यानंतर ते ‘मस्ती’ या सिनेमात दिसले आणि तिथेच त्यांचे प्रेम अधिक घट्ट झाले.

रितेश देशमुखच्या कामाबाबत बोलायचं तर अलीकडेच टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूरसोबत बागी ३ या चित्रपटात दिसला दिसला होता.

प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स दिला होता.

त्यापूर्वी रितेश हाउस फुल ४ मध्ये झळकला होता. या चित्रपटाने तब्बल २८० कोटी रुपयांची कमाई केली होती.

सध्या रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट बनवत आहे. व तो त्यासाठी खूप उत्सुक आहे.

रितेशसोबत या चित्रपटाशी नागराज मंजुळे आणि अजय-अतुल सारखे दिग्गज लोक जोडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हा रितेशसाठी अत्यंत महत्वाकांक्षी चित्रपट आहे.