RMD Foundation | रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप व रक्तदान सोहळा संपन्न (Videos)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – RMD Foundation | रसिकशेठ यांना त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण पूर्ण करता आले नाही व अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागले परंतू आपल्या स्वकर्तुत्वाने आणि कठीण परिस्थितीतूनही कष्टाने उद्योगाच्या उच्च शिखरावर विराजमान झाले आणि उद्योगजगतात जसे अजरामर झाले तसेच सामाजिक कार्यातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा भारतभर उमटविणारे रसिकशेठ यांनी गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आर एम डी फाऊंडेशनच्या मदतीने शिष्यवृत्ती योजना राबवून गेल्या 18 वर्षापासून आज पर्यंत १२००० पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला आहे अशी माहिती फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल (Shobhatai Rasiklal Dhariwal) यांनी दिली. रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या .

आपल्या वडिलांची सामाजिक कार्यपरंपरा सतत कार्यरत राहण्यासाठी नेहमी प्रेरित व प्रवृत्त करतात त्यांच्याच आशीर्वादाने आज भारत भर अनेक सामाजिक उपक्रम सर्वसामान्य लोकांसाठी राबविण्यात येतात व पुढेही नवनिर्माण योजना राबविल्या जातील अशी भावना फाऊंडेशन द्वारा आयोजित रक्तदान शिबिराच्या वेळी अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन (Janhavi Dhariwal-Balan) यांनी व्यक्त केली . यावेळी बालन उद्योग समूहाचे अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan) उपस्थित होते .

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात नशेच्या आहारी जाऊ नये तसेच आपण निवडलेल्या अभ्यासक्रमातून देशसेवा करावी असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी केले.

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शुभेच्छा देण्यासाठी सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर यांनी यावेळी आवर्जून हजेरी लावली व रक्तदात्यांचा उत्साह वाढविला.सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मनपा अधिकारी, उदयोग जगतातील मान्यवर, विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, वृत्तप्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस अधिकारी, इत्यादी रक्तदाते रक्तदानास स्वईछेने आले होते. यावेळी 425 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले .

सर्व रक्तदात्यांचे शोभा धारीवाल यांनी आभार मानले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lonikand Crime | पुणे : सासरी येण्यास नकार दिल्याने पत्नीवर वार, पतीला अटक

Pramod Nana Bhangire | ‘अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना निधी न आणणाऱ्या विरोधकांनी श्रेय लाटू नये’ ! ‘विकास कामात अडथळा आणल्यास करारा जवाब मिलेगा’ – प्रमोद नाना भानगिरे

Pune Cheating Fraud Case | बनावट सह्यांच्या आधारे भागीदाराकडून सव्वापाच कोटींची फसवणूक ! न्यायालयाने जामीन फेटाळूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा पीडित माणिक बिर्ला यांचा पत्रकार परिषदेत आरोप