मावळ तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था; मनसेचे झोपा काढो आंदोलन

मावळ : पाेलीसनामा ऑनलाईन

पुण्याच्या मावळ तालुक्‍यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचाच जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळ कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी गेले असता साडेबारा वाजेपर्यंत एकही अधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध नसल्याने अखेर मनसे पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयांमध्ये झोपा काढा आंदोलन केले.
[amazon_link asins=’B009WNA9V6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e0f29475-8e72-11e8-b8dd-2de663e925bd’]

महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी केलेल्या झोपा काढो आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले, ते तात्काळ कार्यालयामध्ये पोहोचले आणि मनसे कार्यकर्त्यांना तालुक्यामधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील सर्व रस्त्यावरील खड्डे आठ दिवसात बुजवण्याचे लेखी आश्वासन उपअभियंता सोनवणे यांनी दिले आहे. येणाऱ्या आठ दिवसाच्या आत खड्डे न बुजवल्यास मावळ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा ही देण्यात आला. आंदोलनास मनसेचे उपजिल्हाध्यक्ष पंकज गदिया मनविसेचे तालुका अध्यक्ष अशोक कुटेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात