‘Tik Tok’ स्टार ‘शाहरूख खान’ निघाला ‘दरोडेखोर’ !

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – सध्या महागडे छंद पूर्ण करण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी अनेक तरूण गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळल्याचे दिसून येत आहे. मात्र, हे गुन्हे करत असताना त्यांना आपण पकडले जाऊ याची थोडीशी देखील कल्पना नसते. सध्या TikTok ने सर्वांना वेड लावले आहे. या TikTok च्या वेडामुळे अनेक गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहे. असाच एक दरोडेखोराला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली असून तो TikTok स्टार असल्याचे तपासात समोर आले आहे. शाहरूख खान असे या आरोपीचे नाव आहे.

TikTok स्टार असलेल्या शाहरूख खान याचे तब्बल 40 हजारापेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. शाहरूख खानच्या नावाने अकाऊंट असलेल्या या दरोडेखोराचे व्हिडीओ त्याच्या फॉलोवर्सकडून पसंती मिळत असून त्याचे फॉलोवर्स वाढत आहेत. त्याने असाच एक व्हिडीओ TikTok वर टाकला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.


ग्रेटर नोएडा परिसरात काही दिवसांपूर्वी लुटमारीच्या घटना घडत होत्या. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांकडून लुटमार होत असल्याने त्यांची दहशत परिसरात होती. ही टोळी शस्त्राचा धाक दाखवून नागरिकांना लुटत होती. पोलिसांनी या टोळीचा शोध घेऊन अटक केली. ही चार जणांची टोळी मोबाईल आणि रोकड लुटत होती.

त्यांच्याकडे केलेल्या तपासात धक्कादायक महिती समोर आली आहे. या टोळीतील शाहरूख खान हा TikTok चा स्टार असून त्याला स्टायलिश डान्सर या नावाने ओळखले जाते. पोलिसांनी या टोळीला अटक करण्यासाठी पथके तयार केली होती. पोलिसांनी टोळीचा माग काढून आरोपींना अटक केली. यामध्ये शाहरूख खान, असिफ फैजान आणि मुकेश यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी परिसरात रेकी करत होती. यानंतर टोळी प्रमुख शाहरूख खान दरोडा टाकण्याचे प्लॅनिंग करत होता. तसेच तो पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवत होता. जेणेकरून गुन्हा केल्यानंतर पकडले जाऊ नये. दरोड्यात लुटलेला सर्व मुद्देमाल त्याच्याकडे दिला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.