Rocky Aur Rani Ki Prem Kahani | बहुचर्चित ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट; प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता रणवीर सिंग (Actor Ranveer Singh) व अभिनेत्री आलिया भट्ट (Actress Alia Bhatt) यांच्या बहुचर्चित ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटामधून दिग्दर्शक करण जोहर (Director Karan Johar) हा 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्राकडे वळाला आहे. आलिया व रणवीर सिंगला दुसऱ्यांदा स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी दोघांचे चाहते उत्सुक आहेत. या रॉकी और राणी की प्रेम कहानी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) करण्यात आला आहे.

दिग्दर्शक करण जोहर अनेक वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर चित्रपट घेऊन येत आहे तर बाळाच्या जन्मानंतर आलियाचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची उत्सुकता आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी रिलिज झालेल्या ‘तुम क्या मिले’ गाणे (Tum Kya Mile Song) व आज (दि.04) रोजी प्रदर्शित करण्यात आलेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer Launch) अवघ्या काही तासांमध्ये ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ चित्रपटाच्या ट्रेलरला मिलियन्समध्ये व्ह्युज मिळाले असून ट्विटरवर देखील ट्रेंडिंगमध्ये आहे.

‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ ( Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला रणवीर व आलियामधील भांडणे दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये ते करत असलेला पात्र रॉकी रांधवा व बंगाली परिवारातील राणी यांची अनोखी प्रेम कहानी व प्रेमाचा प्रवास मांडण्यात आला आहे. रॉकी व रानी प्रेमामध्ये पडतात व त्यानंतर घरच्यांना मनवण्यासाठी लग्नाआधी एकमेकांच्या घरी राहण्यासाठी जातात आणि तिथून ही प्रेमाची मज्जेशीर गोष्ट सुरु होते. चित्रपटामध्ये असणारा फुल ऑफ ड्रामा, मस्ती व सस्पेंस ट्रेलरमधून लक्षात येत आहे. पॉवरफुल फॅमिली ड्रामा घेऊन दिग्दर्शक करण जौहरचा नवा कोरा चित्रपट येत्या 28 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date) चित्रपटाच्या रोमॅंटिक गाण्याने व जबरदस्त ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Web Title :   Rocky Aur Rani Ki Prem Kahani | rocky aur rani kii prem kahaani trailer karan johar alia bhatt ranveer singh jaya bachchan dharmendra movie trending on twitter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik NCP News | नाशिकमध्ये संघर्ष पेटला, भूजबळ-अजित पवार-शरद पवार समर्थक आमने-सामने; पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरुन राडा

Ajit Pawar | ‘म्हणून मी सरकारमध्ये आलो…’, कॅबिनेटनंतर अजित पवारांच्या विधानाची चर्चा

Actor Ajay Devgn | अभिनेता अजय देवगनची मुंबईमध्ये प्राईम लोकेशनला मोठी गुंतवणूक; किंमत ऐकून व्हाल धक्क

Actress Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूर पापाराझींसमोर करत होती अंग झाकण्याचा प्रयत्न; फोटो व्हायरल

Maharashtra Politics News | बहुमत असताना राष्ट्रावादीला सत्तेत का घेतलं? शिवसेना नेत्याने सांगितले कारण

Actress Ameesha Patel | बॉलीवुडच्या एका निर्मात्यासोबतच्या अफेअरने बर्बाद केले अमिषा पटेलचे पूर्ण करिअर; आता होतोय पश्चाताप

Actress Rekha | अभिनेत्री रेखा यांनी 10 वर्षे का स्विकारली नाही कोणत्याही चित्रपटाची ऑफर? रेखाजींनी दिले उत्तर

Maharashtra Cabinet Decision | राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य; अजित पवार उपमुख्यमंत्री होताच पहिली कॅबिनेट बैठक, घेतले 8 महत्त्वाचे निर्णय