Rohit Patil | गोपीचंद पडळकर यांच्यावर रोहित पाटलांचा पलटवार, म्हणाले – शरद पवारांचे विचार आणि…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पाटील (Rohit Patil) यांनी म्हटले की, शरद पवारांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही संपवू शकत नाही.

 

रोहित पाटील (Rohit Patil) म्हणाले, असा कोणताही पक्ष आणि संघटना संपत नसते आणि माझा जन्मच राष्ट्रवादीच्या स्थापनेबरोबर झाला आहे. त्यामुळे मी तरी राष्ट्रवादीशिवाय अन्यत्र कुठेही जाऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शरद पवारांचा मोठा हात आहे. नवनिर्मिती करणार्‍या शरद पवारांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.

 

महाराष्ट्राचा विकास कोणी केला याची कल्पना सर्वांनाच आहे. शेतकर्‍यांनाही याची कल्पना आहे. पवार साहेबांचे विचार आणि पक्ष कोणीच संपवू शकत नाही. त्यामुळे असा पक्ष संपणार नाही.

काय म्हणाले होते पडळकर…
पडळकर म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर भाजपचा (BJP) झेंडा लागला आहे. भाजपचा हा झेंडा येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या घरावरही लागलेला दिसेल, असे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो.

 

आता आपल्याला भाजपमध्येच जावे लागेल, असे 90 टक्के कार्यकर्ते म्हणतील आणि
मग मुंबईच्या कार्यालयावर नेमका कोणाचा झेंडा लागेल असा त्यांच्यात वाद निर्माण होईल.
90 टक्के राष्ट्रवादी ही भाजपात विसर्जित होईल. तर बहुमताने लोक भारतीय जनता पक्षात येतील.
पडळकर यांच्या याच वक्तव्याला रोहित पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

Web Title :- Rohit Patil | rohit patil replied bjp leader gopichand padalkar over criticism on ncp chief sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंच्या दौर्‍याचा शिंदे गटाने घेतला धसका, शेतकर्‍यांच्या विषयावरही राजकारण, ’असा’ असतो Event! म्हणत उडवली खिल्ली

Uddhav Thackeray | धीर सोडू नका, मदतीसाठी सरकारला भाग पाडू; बळीराजाने उद्धव ठाकरेंच्या हाती दिला ‘आसूड’

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले – ‘वेळ आली आणि राज ठाकरे यांनी…’