Rohit Pawar-Maval Lok Sabha | वडीलांचे राजकीय स्वार्थासाठी पॅचअप, पण भावाने उचलला विडा; रोहित पवार म्हणाले – ‘मावळमध्ये भाऊ पार्थच्या पराभवाचा बदला मी घेणार’

ADV

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Rohit Pawar-Maval Lok Sabha | मागील निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पूत्र पार्थ पवार (Parth Ajit Pawar) याचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी-शिवसेना (Shivsena-NCP) फुटली. बारणे शिंदे गटात तर अजित पवार भाजपाच्या वळचणीला गेले. आता ज्यांनी आपल्या मुलाचा पराभव केला त्यांचाच प्रचार करण्याची वेळ अजित पवारांवर आली आहे. मात्र, पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपला भाऊ पार्थच्या पराभवाचा बदला घेण्याचा विडा उचलत अजितदादांची राजकीय कोंडी केली आहे.(Rohit Pawar-Maval Lok Sabha)

मावळ लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत महायुतीचे (Mahayuti) श्रीरंग बारणे विरूद्ध महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi-MVA) संजोर वाघेरे (Sanjog Waghere) अशी लढत आहे. काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार सातत्याने अजित पवार यांना धारेवर धरत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा अजितदादांच्या दुखऱ्या नसीला हात घातला आहे.

ADV

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार याचा श्रीरंग बारणे यांनी दारुण पराभव केला होता. रोहित पवार यांनी हाच मुद्दा उकरुन काढत अजित पवार आणि पार्थ पवार यांना डिवचले आहे.

रोहित पवार यांनी म्हटले की, माझा भाऊ पार्थ पवारचा पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला होता.
पण काल पार्थचे वडील अजित पवार स्वतः श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते.
आधी वडीलधाऱ्या शरद पवारांची साथ सोडली, आता पार्थचा पराभव करणाऱ्यांचा प्रचार वडील अजितदादा करत आहेत.

पार्थचा पराभव पचवून नव्हे तर अजितदादांना स्वतःचे बरेच काही पचवायचे असल्याने ते श्रीरंग बारणे यांचा प्रचार करत आहेत.
मात्र, पार्थने चिंता करू नये. मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभेत आलो आहे,
अशी प्रतिज्ञा रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान, रोहित पवार यांच्या या वक्तव्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | असा पोरकटपणा दाखवाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा विजय कधीच होत नाही, पुरावे माझ्याकडेही, अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा

Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी

Pune Fraud Case | पुणे: आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, आरोपीला जामीन मंजूर

Hadapsar Pune Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार दिल्याने तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

ACB Trap Case | पाच हजार रुपये लाच घेताना पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Aaditya Thackeray In Maval Lok Sabha | आदित्य ठाकरे आज मावळमध्ये, संजोग वाघेरे भरणार उमेदवारी अर्ज, म्हणाले ”महागाईने त्रस्त जनता…”