Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांचा अजित पवारांना सवाल, ”…भावाने वेगळी भूमिका घेतली तर ताई चुकली आहे का?”

बारामती : Rohit Pawar On Ajit Pawar | बारामतीमध्ये (Baramti Lok Sabha) भावाने बहिणीला शब्द दिला होता, मी राजकीय यंत्रणा बघतो, तू संसदेत प्रश्न मांडायचे आणि काम करुन घ्यायचे ठरले होते. तुमच्या घरात राखी पौर्णिमा होते का आमच्या घरात होते. भावानं बहिणीला शब्द दिला तर तो पाळायचा असतो. जर भावाने वेगळी भूमिका घेतली तर ताई चुकली आहे का?, असा सवाल रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका करताना केला आहे. ते बारामतीमधील सुप्यात बोलत होते.

भाजपावर टीका करताना रोहित पवार म्हणाले, भाजपची खऱ्या अर्थाने ताकद असती तर ते लोकंच्या मागे लागले असते का? भाजपमध्ये (BJP) अहंकार ठासून भरलाय, त्यामुळे त्यांचे वाटोळे झाले. पूर्वी राष्ट्रवादीच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटांची वेळ होती, पण भाजपच्या नादी लागून आता त्यांचे बारा वाजलेत. भाजपने कुटुंब फोडल्याची बाब लोकांना आवडलेली नाही.

रोहित पवार पुढे म्हणाले, बारामतीमध्ये लोक म्हणतात काही काळजी करू नका, साहेबांना राज्याचा दौरा करायला सांगा. आम्ही इथे आहोत, सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) तीन लाखांनी निवडून देऊ. पहिल्यांदा वडिलांना निवडून दिले, परत मुलाला दिले, पवार साहेब आमच्यासाठी वडिलांच्या स्थानी आहेत.

रोहित पवार म्हणाले, भाजपाच्या नादी लागून तुम्ही वडिलांना सोडलं,
हीच गोष्ट सर्व सामान्य लोकांना आवडली नाही. त्यांची वक्तव्य लोकांना अजिबात पटत नाहीत.
जसजसे अजित पवार बोलतील, तसतसे सुप्रिया सुळे यांना लीड मिळेल.

भाजपावर हल्लाबोल करताना रोहित पवार म्हणाले, मी पहिल्यापासून भाजपच्या विरोधात लढतोय.
कोणाच्या डोळ्यात पाणी आले त्यापेक्षा भाजपाला हद्दपार करणे महत्वाचे आहे.
भाजपवाले म्हणतात की साहेबांना राजकीयदृष्ट्या संपवायचे आहे. इथल्या लोकांना हे कळालं आहे.
ही लढाई साहेब विरुद्ध भाजप आहे. लोक भाजपाला हद्दपार करतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त