Rohit Pawar On Ink Splash On Chandrakant Patil |आम्ही शाई फेकीचे समर्थन करीत नाही – आमदार रोहित पवार

पुणे : Rohit Pawar On Ink Splash On Chandrakant Patil | राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती होत असल्याच्या निषेधार्थ रविवारी रात्री सोलापुरात काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. सोलापुरच्या शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली. या शाईफेकीचे पडसाद आता उमटू लागले आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Rohit Pawar On Ink Splash On Chandrakant Patil)

आमदार रोहित पवार म्हणाले, आम्ही चंद्रकांत पाटीलांवरील शाई फेकीचे समर्थन आम्ही करत नाही आणि ते योग्य नाही.
आम्ही सुद्धा आंदोलन करू शकलो असतो. बसेस जाळू शकलो असतो, पण आम्ही तरुणांच्या प्रश्नावर शांततेच्या मार्गाने
युवा संघर्ष यात्रा काढत आहोत.

रोहित पवार म्हणाले, तरुणांच्या प्रश्नांची दखल राज्य सरकार घेताना दिसत नाही.
काही दिवसांपूर्वी घाई गडबडीत ११ हजार जणांची कंत्राटी भरती केली. पुढील काही महिन्यांत १ लाख जणांची भरती होईल.
भरती प्रक्रियेतील कंपन्या सत्ताधारी पक्षातील नेते मंडळींच्या आहेत. त्यांना बलाढ्य करायचे ठरवले आहे.
जे युवक अनेक वर्षांपासून पुढे जायचा प्रयत्न करत आहेत त्यांना बाजूला करत आहेत.
कंत्राटी पद्धतीवर नोकरीवर घेतल्यावर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने सेवा मिळणार, हा देखील प्रश्न आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MP Sanjay Raut On CM Eknath Shinde | संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका; म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांना ‘समाजवाद’ शब्द माहित आहे का?’

Rohit Pawar On Ink Splash On Chandrakant Patil | शाई फेक योग्य नाही – आमदार रोहित पवार

Amol Mitkari | भंगार पुस्तकाच्या विक्रीसाठी बोरवणकर यांचे अजितदादांवर आरोप – अमोल मिटकरी

Pune Police MPDA Action | पुणे शहरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 49 वी स्थानबध्दतेची कारवाई