Rohit Pawar On PM Modi Offer | मोदींच्या ऑफरवर रोहित पवारांची प्रतिक्रिया, ”ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Rohit Pawar On PM Modi Offer | नकली राष्ट्रवादी (Nakli NCP), नकली शिवसेना (Nakli Shivsena) पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन (Congress) होण्याचे मन तयार केले आहे. मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर या, सर्व स्पप्न पूर्ण होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नंदुरबारच्या सभेत (Nandurbar Sabha) म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतल्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया देत मोदी सरकारला टोला लगावला आहे.(Rohit Pawar On PM Modi Offer)

मोदींच्या या अशा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय माझ्याकडून कधीही होणार नाही, असे थेट प्रत्युत्तर पवार यांनी दिले आहे. दरम्यान, याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की, राज्यात फोडाफोडीचे राजकारण करूनही महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता भाजपासोबत जात नसल्याचे दिसताच पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याची ऑफर दिली. ही ऑफर म्हणजे भाजपा केंद्रात पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

दरम्यान, मोदींच्या या ऑफरवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटले होते की, देशामध्ये संसदीय आणि लोकशाही पद्धत मोदींमुळे संकटात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकण्यात आले. केंद्र सरकारच्या सहभागाशिवाय एवढी मोठी कारवाई होत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वासच नाही. हा समज आता लोकांमध्येही पक्का झाला आहे. अशा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय माझ्याकडून कधीही होणार नाही.

शरद पवार म्हणाले, गांधी-नेहरूंची विचारधारा आम्हाला प्रिय आहे. ती सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी एका भाषणात मुस्लीम समाजाबद्दल काहीतरी भाष्य केल्याचे आम्ही ऐकले. हा देश पुढे घेऊन जायचा असेल तर सर्वधर्मीयांना एकत्र घेऊन जावेच लागेल. एखाद्या समाजाला बाजूला ठेवून पुढे जाता येणार नाही. पंतप्रधान मोदी अलीकडे वारंवार एका धर्माच्या विरोधात भूमिका मांडत आहेत, अशी भूमिका मांडणाऱ्यांच्या बरोबर आम्ही कधीही जाणार नाही.

शरद पवार म्हणाले, आजकाल ते महाराष्ट्रात वारंवार येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या विचारांविरोधात जनमत तयार होत आहे. यामुळे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे ते अशी संभ्रम निर्माण करणारी विधाने करत आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना 25 लाखांचा गंडा

Maval Lok Sabha | मतदानाच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील सुरक्षा व्यवस्थेचा दीपक सिंगला यांचेकडून आढावा

Ravindra Dhangekar | विविध संस्था-संघटनांचा रवींद्र धंगेकरांना पाठिंबा