Rohit Pawar On Ram Shinde | ‘मंत्रिपद सांभाळूनही विरोधकांना जीआर कळत नसेल, तर…’; आमदार रोहित पवार यांचा राम कदमांना टोला

कर्जत-जामखेड : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar On Ram Shinde | कर्जत जामखेडचे (Karjat-Jamkhed) आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी महाविकास आघाडीकडे (MVA Government) पाठपुरावा करून जलसंधारणाची अनेक कामे मंजूर करून आणली. पण, शिंदे फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) आल्यानंतर या कामाचे श्रेय घेता यावे यासाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) यांनी ही कामे रोखून ठेवली आहेत, असा आरोप रोहित पवारांनी राम शिंदेंवर केला होता. त्यानंतर, अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) इतर तालुक्यांतील कामांची स्थगिती उठवली गेली, पण कर्जत जामखेड भागातील कामाचे श्रेय घेता यावे म्हणून आमदार राम शिंदे तेथील कामे रोखून धरत आहेत, असा आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. (Rohit Pawar On Ram Shinde)

त्यानंतर, जामखेड येथील नळ पाणीपुरवठा व भूमिगत गटार योजना मंजूर झाल्यानंतर जामखेड ग्रामस्थांच्या वतीने आमदार रोहित पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी रोहित पवार यांनी राम कदमांवर जोरदार टीका केली आहे. “स्वतः मंत्री असताना झोपलेले राम शिंदे आता अचानक जागे झाले आहेत. मात्र, मी केलेल्या पाठपुराव्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना देऊन त्यांची कानउघाडणी केली आहे. त्यामुळे फुकटचं श्रेय घेण्यासाठी हवेत गेलेलं त्यांचं विमान लॅण्ड होण्यास मदत होईल,” असा टोला आमदार रोहित पवार यांनी राम कदमांना लगावला आहे.

पवार म्हणाले, ‘मंत्रिपद सांभाळूनही जर माझ्या विरोधकांना जीआर कळत नसेल,
तर त्यांच्या माहितीसाठी पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण तपशील तारखेनुसार बोर्डावर सोप्या भाषेत लावला आहे.
कोणाला या योजनेचाही तपशील हवा असेल तर तोही दिला जाईल.
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये विकासकामांना निधी मंजूर करून घेणे व कामे मार्गी लावण्यासाठी
आम्ही प्रयत्न केले व कुठलेही काम रद्द किंवा स्थगित करण्याचा प्रयत्न केला नाही.
मी जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटायचो, तेव्हा स्वाक्षरी करतो, असे मुख्यमंत्री सांगत होते;
परंतु कामाचे श्रेय रोहित पवारांना जाऊ नये, यासाठी माझे विरोधक मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दबाव आणत होते
आणि स्वतः श्रेय घेण्याचा प्रयत्न करत होते.’

Web Title :- Rohit Pawar On Ram Shinde | NCP MLA rohit pawar slams bjp mla ram shinde on taking credit of work karjat jamkhed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Silver Prices | सोन्याची किंमत वाढली, तर चांदी घसरली

Devendra Fadnavis-Balasaheb Thorat | बाळासाहेब थोरातांसमोरच देवेंद्र फडणवीसांची भर स्टेजवर काँग्रेसच्या मोठया नेत्याला ओपन ऑफर

Sushma Andhare | ‘त्यांची प्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात…’; अनिल खोचरेंचा सुषमा अंधारेंना टोला