Rohit Pawar | हे योग्य नाही… रोहित पवारांचे आपल्याच सरकारला खडे बोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  Rohit Pawar | राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार सध्या राज्यात गाजत आहे. उद्यावर परीक्षा असताना अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना बसमधून उतरण्याची वेळ आली, त्यामुळे सर्व स्तरातून सरकारच्या कारभारावर टीका होत आहे. आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आरोग्य भरती परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

रोहित (Rohit Pawar) यांनी ट्विटकरत नाराजी व्यक्त करतानाच आपल्याच सरकारला खडेबोल सुनावले आहेत. मागील सरकारने आरोग्य भरती रखडवल्याने आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली. आपल्या सरकारने आरोग्य भरती सुरू केली, पण गोंधळाचं वातावरण दिसतंय. असंच चालू राहिलं तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील? याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा, असं त्यांनी म्हंटले आहे.

परीक्षा सुरळीत होणं आवश्यक होतं. अनेकांची आर्थिक स्थिती सामान्य आहे. परीक्षेला जाण्यासाठी त्यांनी उसने तर काहींनी व्याजाने पैसे आणले, परंतु आता त्यांना आर्थिक भुर्दंड बसलाय.
त्यामुळं पुन्हा लवकर परीक्षा घ्यावी आणि त्यावेळी मोफत एसटी प्रवासाचा पर्याय देता येईल का,याचा विचार व्हावा, असंही रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

पारदर्शकतेसाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या देखरेखीत परीक्षा घेण्याबाबत विचार व्हावा.
सध्या प्रत्येक पदासाठी व प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी आकारली जाते, हे योग्य नाही.
सरकारने यात लक्ष घालून परिक्षार्थींच्या हिताचा निर्णय घ्यावा, ही विनंती असल्याचं ट्विट पवार यांनी केले आहे.

 

Web Title : Rohit Pawar | This is not right … Rohit Pawar’s own government should be stoned

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकेत 91 जागांसाठी मोठी भरती; पगार 1.50 लाख रूपयांपर्यंत

SIM Card Portability | तुमचा मोबाइल नंबर फक्त 1 रुपयांत घरबसल्या पोर्ट करता येणार; जाणून घ्या नवा नियम

Anti Corruption | 20 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात