ICC World Cup 2019 : वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक ‘मॅन ऑफ द मॅच’ अवॉर्ड जिंकण्याची ‘हिटमॅन’ रोहितकडे नामी संधी, ‘या’ दोघांना सोडलं मागं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारताने ४४ व्या सामन्यात श्रीलंकेवर मोठा विजय मिळवून सेमीफायनलमध्ये धमाकेदार प्रवेश केला आहे. या सामन्यात भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी शानदार शतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. रोहित शर्माने या स्पर्धेत ५ शतके झळकावली असून वर्ल्डकप इतिहासात एका स्पर्धेत पाच शतके झळकावणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मा आपला हा दुसरा वर्ल्डकप खेळत असून या वर्ल्डकपमध्ये त्याने विक्रमांची रांग लावली आहे. यामध्ये पाच शतकांबरोबर सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच मिळवणारा खेळाडू देखील ठरणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध मिळवलेला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्याचा पाचवा अवॉर्ड ठरला आहे. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकण्याचा रेकॉर्ड भारताच्या सचिन तेंडुलकर याच्या नावावर असून याने ४४ सामन्यांत ९ वेळा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळवलेला आहे. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंग याने ६ मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकले आहेत. मात्र या दोघांनीही निवृत्ती घेतली असल्याने रोहित शर्मा याच्याकडे हा विक्रम मोडण्याची संधी आहे. सध्या रोहित शर्मा विवियन रिचर्ड्स, ग्रॅहम गूच, सनथ जयसूर्या, मार्क वॉ, लांस क्लूजनर, एबी डीविलिअर्स यांच्यासह तिसऱ्या क्रमांकावर असून या सर्वांनी ५ मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकले आहेत. मात्र रोहित शर्मा याने हा पराक्रम १६ सामन्यांत केला असल्याने त्याच्याकडे हा विक्रम मोडण्यासाठी आणखी खूप सामने आहेत.

दरम्यान, त्याच्याखालोखाल सौरव गांगुली आणि युवराज सिंह यांनी प्रत्येकी ४ मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकले असून शिखर धवन आणि कपिल देव यांनी ३ मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड अवॉर्ड जिंकले आहेत.

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’च्या नाऱ्याचा वापर : अमर्त्य सेन

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !