विराट नंतर रोहितने अनुष्काला देखील केलं ‘अनफॉलो’, ‘या’ कारणामुळे दोघांमध्ये चांगलच ‘फाटलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपनंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे भारतीय संघात उभी फूट पडल्याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. भारतीय संघ ३ ते १४ ऑगस्ट दरम्यान वेस्टइंडीजमध्ये ३ टी -२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याचबरोबर अँटिग्वा आणि जमैका मध्ये दोन कसोटी सामने देखील खेळणार आहे.

रोहित शर्मा-विराट कोहली

गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात दुरावा असल्याचे म्हटले गेले होते. त्यानंतर रोहित शर्माकडे कर्णधारपद दिले जाणार असल्याच्या देखील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत होत्या. रोहित आणि विराट यांच्यात दुरावा निर्माण झाला तो सेमीफायनलमध्ये. मोहम्मद शमी याने उत्तम कामगिरी केलेली असताना देखील संघाबाहेर केल्याने रोहित आणि विराट यांच्यात दुरावा आल्याचे म्हटले जात आहे.

Anushka Sharma

त्यानंतर आता रोहित शर्मा याने विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. याआधी रोहितने विराट कोहली याला देखील अनफॉलो केले आहे. याआधी हे दोन जोडपी एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करत असल्याची माहिती मिळत आहे. एका इंग्रजी वृत्त माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या दोन खेळाडूंमध्ये खूप आधीपासूनच दरार पडली आहे.

विराट कोहली और रोहित शर्मा

शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी विराट कोहलीच्या मॅनेजमेंट कंपनीतून बाहेर पडल्यामुळे या दोघांमध्ये दुरावा आल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या प्रशासकीय समितीची आज दिल्लीत बैठक पार पडत आहे. या बैठकीत याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.

विराट कोहली-रोहित शर्मा

दरम्यान, कर्णधार विराट हा विंडीज दौऱ्यातून विश्रांती घेणार होता. मात्र कर्णधारपदाची टांगती तलवार डोक्यावर असल्याने त्याने या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like