VIDEO : ‘त्या’ सिनेमात दिसणार केदार जाधव ; रोहित शर्माचा मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये आहे. नेट प्रॅक्टिससोबतच टीम इंडियाचे मस्ती करतानाचे व्हिडीओ देखील समोर येत असतात. अशातच टीम इंडियाचा एक व्हिडीओ समोर आला  आहे. त्यात रोहित शर्माने एक खुलासा केला आहे. त्याने सांगितले आहे की, लवकरच केदार जाधव बॉलिवूडचा सिनेमा ‘रेस 4’ मध्ये दिसणार आहे. आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 च्या आपल्या दुसऱ्या वार्मअप मॅचसाठी जाताना रोहितने बसमध्ये हा व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत रोहितसोबत रवींद्र जडेजा आणि केदार जाधव देखील दिसत आहे. यावेळीच रोहितने सांगितले की, केदार ‘रेस 4’ मध्ये अॅक्टिंग करताना दिसू शकतो.

व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत आहे की, रोहितने रवींद्र जडेजाचे वॉर्मअप मॅचमध्ये न्यूझिलंड विरुद्ध अर्धशतकीय खेळी केल्याबद्दल कौतुक केले आहे. रोहित म्हणतो की, “जडेजा तू मॅचमध्ये चांगली बॅटींग केलीस.” यानंतर रोहित केदार जाधव सोबत ‘रेस 4’ बद्दल बोलला. रोहित म्हणाला की, “जड्डू सोबत बसलेले आमचे रेस 4 चे नवीन अॅक्टर. आम्ही असं ऐकलं आहे की, तुला रेस 4 मध्ये स्पेशल अपियरंससाठी ऑफर करण्यात आली आहे.” याला उत्तर देताना केदार म्हणतो की, “हा परंतु अजून ते फायनल झालेलं नाही. आमचं यावर बोलणं सुरु आहे. अशी आशा आहे की, चार महिन्यांनी तुमच्यासाठी काही सरप्राईज असावं.

https://www.instagram.com/p/Bx7ZhO2hCvZ/?utm_source=ig_embed

तुम्हाला सांगू इच्छितो की, रेस 4 सिनेमाला घेऊन अद्याप  कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रेस फ्रेंचाईजीचा पहिला सिनेमा 2008 मध्ये आला होता. या सिनेमात सैफ अली खान बिपाशा बसु, अक्षय खन्ना, अनिल कपूर प्रमुख भूमिकेत दिसले होते. शिवाय, 2012 मध्ये रेस 2 आणि मागील वर्षी रेस 3 रिलीज झाला होता.

You might also like