फक्त 9000 रुपयांमध्ये घरी आणू शकता नवीन Royal Enfield Bullet 350, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Royal Enfield Bullet 350 | मजबूत आणि दमदार मोटरसायकलसाठी प्रसिद्ध रॉयल एनफिल्ड कंपनी देशात सर्वाधिक 350cc बाईक विकते. रेट्रो डिझाईन, उत्तम लुकमुळे या बाईकला लोकांची सर्वाधिक पसंती आहे. या बाईक्स थोड्या महाग असल्याने अनेकांना इच्छा असूनही ती खरेदी करता येत नाही. अशा ग्राहकांसाठी रॉयल एनफिल्डने अवघ्या 9 हजार रुपयात नवीन बुलेट घरी घेऊन जाण्याची जबरदस्त ऑफर आणली आहे. (Royal Enfield Bullet 350)

 

यासाठी कंपनीने आणलेल्या एका फायनान्स योजनेंतर्गत कंपनीच्या विविध मॉडेल्सवर डाउन पेमेंट आणि ईएमआयची सुविधा दिली आहे. यात रॉयल एनफील्ड बुलेट 350 वर सर्वात कमी रु.9000 चे डाउन पेमेंट ठेवले आहे.

 

बुलेट 350 किक स्टार्ट व्हर्जनची ऑन रोड प्राईस 1,71,017 रुपये आहे. 9000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर हे मॉडेल घेतल्यास ऑनलाइन ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार 9.7 टक्के व्याजदराने पुढील 3 वर्षांसाठी दरमहा सुमारे 5 हजार रुपयांचा ईएमआय आहे. या योजनेत तुम्ही रॉयल एनफिल्ड बाईक सुद्धा घेऊ शकता. (Royal Enfield Bullet 350)

काही दिवसांपूर्वीच रॉयल एनफिल्डने 350 सीसी सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्ड हंटर 350 ही नवीन बाईक आणली आहे.
दोन व्हेरिएंटमध्ये असलेल्या या बाईकची प्रारंभिक किंमत सुमारे 1.5 लाख रुपये आहे आणि प्रमुख व्हेरिएंटची किंमत सुमारे 1.6 आहे.
हंटर 350 ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात हलकी बाईक आहे.

 

रॉयल एनफिल्ड बाईकची मागणी भारतीय बाजारपेठेत कायम असून कंपनी श्रेणी सातत्याने वाढवत आहे.
कंपनी हंटर 350 नंतर आता नवीन जनरेशन बुलेट 350 देखील बाजारात आणणार असल्याचे समजते.
मीडिया रिपोर्टनुसार, रॉयल एनफील्ड आता इलेक्ट्रिक बाइक सेगमेंटमध्ये देखील प्रवेश करणार असून ही बाईक 2025 पर्यंत सादर केली जाऊ शकते.

 

Web Title :- Royal Enfield Bullet 350 | bullet 350 finance and emi details available just nine thousand rupees of down payment auto

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dawood Ibrahim Brother Iqbal Kaskar | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर रुग्णालयात

 

Acidity Problems | अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेमुळे त्रस्त आहात का? करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, ताबडतोब होईल परिणाम

 

Nilesh Rane | रिफायनरी प्रकल्पावरून निलेश राणेंचा ताफा; राणे म्हणाले – ‘मी हात जोडून माफी मागतो…’