Satara News : रॉयल वेजचा चेअरमन विठ्ठल काळपेला अटक

लोणंद/सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  लोणंद येथील रॉयल वेज मार्केटिंग बिजनेस प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक करुन फरार झालेल्या कंपनीच्या चेअरमनला लोणंद पोलिसांनी अटक केली आहे. विठ्ठल अंकुश कोळपे (वय-30 रा. कुसूर ता. फलटण) असे अटक करण्यात आलेल्या चेअरमनचे नाव आहे.

रॉयल वेज कंपनीच्या मध्यमातून कोळपे याने शिरुर तालुक्यातील 28 एजंटच्या माध्यमातून सातारा, लोणंद, कोरेगाव, म्हसवड, नातेपुते, अकलूज, सांगली, बागलकोट या विभागातील लोकांना जमीन व दामदुप्पट रक्कम करुन देतो असे सांगून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्या लोकांनी विठ्ठल कोळपे याच्या विरोधात लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर विठ्ठल कोळपे हा फरार झाला होता. कोळपे याला अटक करण्यासाठी लोणंद पोलिसांनी पथके तयार करुन पथके ठिकठिकाणी रवाना केली होती. अखेर शुक्रवारी (दि.12) विठ्ठल कोळपे याला अटक करण्यात लोणंद पोलिसांना यश आले. त्याला आज (शनिवार) न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी व हेड कॉन्स्टेबल महेश सपकाळ करीत आहेत.