RSS च्या कार्यकर्त्यांनी मुस्लिमांना वाटलं जेवण, जावेद अख्तर यांनी शेअर केला व्हिडीओ !

हैदराबाद : वृत्तसंस्था – गीतकार आणि लेखक जावेद अख्तर नेहमीच आपल्या ट्विट्समुळं चर्चेत येत असतात. पुन्हा एकदा असंच काहीसं झालं आहे. एका युजरने जावेद अख्तर यांना टॅग करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ जावेद अख्तर यांनी शेअर म्हणजेच रिट्विट केला आहे. खास बात अशी की हा व्हिडीओ आरएसएसचा आहे.

एका युजरनं ट्विटरवर आरएसएसचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिसत आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मुसलमानांना जेवण वाटत आहेत. या युजरनं जावेद अख्तर आणि शबाना आझमी असं दोघांनाही यात टॅग केलं आहे. व्हिडीओ शेअर करताना युजरनं म्हटलं की, आरएसएसनं हैद्राबादमध्ये मुस्लिमांना जेवणाचं वाटप केलं. जावेद यांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. त्यांनी याला काहीही कॅप्शन दिलेलं नाही.

जावेद यांनी शेअर केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like