RSS On PM modi Meets Pope Francis | मोदी-पोप भेटीवर RSS ने म्हटले,-‘अशा भेटींमुळे आपल्या…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RSS On PM modi Meets Pope Francis | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी (दि.30) ख्रिश्चन (Christian) धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु असलेल्या पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांची व्हॅटिकन सिटीमध्ये (Vatican City) भेट घेतली. त्यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून गोवा विधानसभेच्या (Goa Assembly) पार्श्वभूमीवर या भेटीचं महत्त्व वेगळं असल्याचं मानलं जातंय. मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे निमंत्रण (Invitation to visit India) दिले आहे. परंतु जगात सर्वाधिक संख्या असलेल्या ख्रिश्चन धर्मियांच्या रोमन कॅथलिक पंथाच्या (Roman Catholicism) प्रमुखाची भेट घेणं भाजपची (BJP) मातृसंस्था असलेल्या RSS ला रुचलंय का? असा सवाल उपस्थित होत होता. संघाची (RSS) यावर काय प्रतिक्रिया आहे याबाबत उत्सुकता होती. याबाबत आता संघाने स्वत:चं आपली भूमिका मांडली आहे. (RSS On PM modi Meets Pope Francis)

Gold Price | धनत्रयोदशीला खरेदी करा सोने, दिवाळीनंतर 8000 रुपयांनी होऊ शकते महाग!

काय झालं बैठकीत ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॅटिकन सिटी याठिकाणी पोहचल्यानंतर पोप फ्रान्सिस यांची बैठक पार पडली. या दोघांचीच ही भेट शिष्टमंडळस्तरीय चर्चेच्या अगोदर झाली आहे. या भेटीदरम्यान काही कोविडच्या समस्यांबाबतील विविध विषयांवर चर्चा आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर (Dr. S. Jaishankar) देखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक केवळ 20 मिनिटांची होती मात्र तासभर चालली. यावेळी मोदी आणि पोप यांनी आपल्या पृथ्वीला अधिक चांगले बनवण्याचा उद्देशाने विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये हवामान बदलाशी लाढा देणे आणि गरिबी दूर करणे या विषयांचा समावेश होता.

काय म्हटले संघाने ?

मोदी-पोप यांच्या भेटीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) प्रतिक्रिया दिली आहे.
संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे (Dattatray Hosballe) यांनी म्हटेले की,
या भेटीमधून भारताचाच सन्मान अधिक वाढला आहे.
जर देशाच्या सरकारच्या प्रमुखांनी जगात सध्या असणाऱ्या नागरी जीवनामधील सर्वोच्च स्थानी असणाऱ्या व्यक्तीची भेट घेतली तर त्यात गैर काय आहे? असं त्यांनी म्हटलं.
आपण सर्वजण हे वसुधैव कुटुम्बकम् या विचारसणीवर विश्वास ठेवणारे आहोत, आपण सर्व धर्मांचा सन्मान करतो.
अखिल भारतीय कार्यकारणी मंडळाची तीन दिवसीय बैठक संपल्यानंतर सरकार्यवाहक होसबळे यांनी हे भाष्य केलंय. (RSS On PM modi Meets Pope Francis)

हे देखील वाचा

Dhantrayodashi 2021 | यावेळी धनत्रयोदशीला केवळ 1 रुपयात खरेदी करा सोने, जाणून घ्या काय आहे पद्धत?

Parambir Singh | परमबीर सिंग बेल्जियममध्ये आहेत, काँग्रेस नेत्याचा दावा; केली ‘ही’ मागणी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : RSS On PM modi Meets Pope Francis | on the modi pope francis meeting the rashtriya swayamsevak sangh (RSS) said because of such visits your

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update