RTO Registration Certificate | RTO चा नवा नियम ! वाहन खरेदीनंतर नोंदणीसाठी आरटीओमध्ये जाण्याचे हेलपाटे थांबणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  RTO Registration Certificate | प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक नवी सुविधा जारी केली आहे. ही सुविधा गाडी खरेदी करणा-या ग्राहकांसाठी अगदी उपयोगी ठरणार आहे. आता वाहन खरेदी केल्यानंतर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात (RTO Registration Certificate) जाण्याची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे आता तुम्ही घरी बसून वाहन खरेदीनंतरची नोंदणी करु शकणार आहे. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही.

 

परिवहन खात्याने या सुविधेसाठी संकेतस्थळावर आवश्यक बदल करण्याची सूचना एनआयसीला दिल्या आहेत.
या सुविधेचा सर्वसामान्यासाठी खुप सोयीस्कर फायदा होणार आहे तर, आरटीओ कार्यालयातील (RTO) दलालांनाही याचा दणका बसणार आहे.
कारण, कार्यालयात नागरीकांची ये-जा थांबल्याने दलालांना काही कामच राहणार नसल्याचाही एक प्रश्न उभा राहणार आहे.

 

टुव्हीलर आणि फोरव्हीलर (Two-wheeler and four-wheeler) वाहन खरेदी केल्यानंतर आता थेट ऑनलाईनच्या माध्यमातुन याची नोंदणी करणे शक्य असणार आहे.
त्याचबरोबर घरबसल्या तुम्हाला आरसी बुक उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे टुव्हीलर किंवा फोरव्हीलर वाहन ज्या ठिकाणी खरेदी केली त्या शोरुममध्ये ही सुविधा उपलब्घ असणार आहे.
त्यामुळे नागरिकांची आरटीओ कार्यालयात होणारे हेलपाटे वाचणार आहेत. हि सुविधा नागरीकांसाठी सोयीस्कर झाली आहे.
त्याचबरोबर सर्व जुन्या टुव्हीलर आणि फोरव्हीलर वाहनांचा यात समाविष्ट (RTO Registration Certificate) करण्यात आला आहे.

 

Web Title : RTO Registration Certificate | registering online after purchasing a vehicle is easy no need to go to the rto office

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nana Patole | ‘साखर कारखाने भाजपच्या लोकांनीही विकत घेतलेत’ (व्हिडीओ)

Earn Money | ‘या’ वनस्पतीची लागवड करून करा लाखोंची कमाई ! सरकार देखील देतंय अनुदान, जाणून घ्या

Captain Amarinder Singh | पंजाबच्या राजकारणात नवा वाद ! तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडची ‘खमंग’ चर्चा