Nana Patole | ‘साखर कारखाने भाजपच्या लोकांनीही विकत घेतलेत’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | गेल्या काही दिवसांपासून साखर कारखान्यावरून राज्यात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संबधित कारखान्यावर छापेमारी करण्यात आली. यानंतर कालच अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच कारखाने विक्री केल्याची यादीच त्यांनी जाहीर केली. यानंतर आज (शनिवारी) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे अभय छाजेड यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, साखर कारखाने भाजपाच्या लोकांनीही विकत घेतले आहेत. कोणाकोणावर आरोप करतात ते बघूच. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जे बोलले त्याला काँग्रेसचे पूर्ण समर्थन आहे असे पटोले यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, भाजपाला सत्तेची गुर्मी चढली आहे. देशात कोरोनाने थैमान घातले. अनेकांच्या घरातील कर्ते पुरूष गेले. असे असताना पंतप्रधान पदावरील व्यक्ती लसीकरणाचे सेलिब्रेशन करत असेल तर दुर्दैवी आहे. कोरोनावर त्यांना प्रभावी उपाय करता आले नाहीत, उपचारांमध्येही भ्रष्टाचार केला. लक्ष दुसरीकडे वळवायचे म्हणून असले ऊद्योग त्यांना सुचतात. असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

पुढे नाना पटोले म्हणाले, देशात इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येतात कसे याची चौकशी व्हायला हवी. यात भाजपाच्या निकटचे बडे उद्योगपती व भाजपाचे लोकही गुंतले असल्याचा काँग्रेसला संशय आहे. कोणकोण भागीदार आहे, कोणाचा हात आहे हे सगळे तपासात येईल, पण देशाच्या तरूणाईला अशा प्रकारे नादाला लावणे काँग्रेस खपवून घेणार नाही. शाहरूख खानच्या पोराच्या ड्रग प्रकरणाला भाजपा हिंदू मुस्लिम असा रंग देत असल्याचा आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

 

दरम्यान, भाजपाने मागील 7 वर्षांच्या सत्तेच्या काळात देश 50 वर्षे मागे नेला.
त्यांचा खरा चेहरा आता भारतीय जनतेला समजला आहे, त्यामुळे आता त्यांना कोणी फसणार नाही.
पोटनिवडणूकात जनतेने ते दाखवून दिले आहे, असा दावा पटोले यांनी केला आहे.

 

Web Title :- Nana Patole | sugar factories were also bought bjp people nana patole ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Captain Amarinder Singh | पंजाबच्या राजकारणात नवा वाद ! तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडची ‘खमंग’ चर्चा

Thyroid Symptoms | अचानक वजन कमी झाले किंवा वाढू लागले तर व्हा सावध; असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या

Latur District Bank Election | भाजपला धक्का ! लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद