Rupali Patil Thombare On Ravindra Dhangekar | अजित पवारांवरील धंगेकरांच्या टीकेला रुपाली ठोंबरेंचे उत्तर, रवी भाऊ…अजितदादा महायुतीत आहेत हा तुमचा त्रास

पुणे : Rupali Patil Thombare On Ravindra Dhangekar | आमदार रवी भाऊ धंगेकर, फडवणीस साहेबांनी (Devendra Fadnavis) अजितदादांचे हातपाय बांधले, असे तुम्ही बोलून गेलात. पण तुम्हाला आठवण करून दयायची आहे, हे तेच अजितदादा (Ajit Pawar) आहेत, ज्यांनी महविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) असताना तुमच्या आमदारकीचे हात पाय झटकून, तन, मन, धनाने जोरात काम केले, आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना जोमात काम करायला सांगितले. आता दादा महायुतीत आहे हा तुमचा त्रास आहे, अशा शब्दात पुण्यातील राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.

रुपाली पाटील यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, अजितदादा सुशिक्षित आहेत. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. ते कर्तव्यदक्ष नेते आहेत. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री फडवणीस साहेब आहेत आणि दादा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत.

पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, पुण्यात ज्या अल्पवयीन मुलाकडून नशापणी करत अपघात घडला, त्यात दोन तरुण मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला. भयाण आणि धक्कादायक घटनेने पुणे हादरले. त्यात खुद्द त्या खात्याच्या प्रमुखाने, गृहमंत्री यांनी पोलीस आयुक्तालय इथे येवून कडक कारवाईचे आदेश दिले. कर्तव्यात कसूर केलेल्या पोलिसांचे निलंबन केले.

महायुतीचे सरकार असल्याने अजितदादा आणि फडवणीस साहेब यांच्यातील समन्वय, संवाद एकत्र काम करण्याची दोघांची शैली तुम्ही पाहताय. याचा जास्त वेदना होत आहेत याची जाणीव आहे आम्हाला. गृहमंत्र्यांनी कारवाई आदेश दिले म्हणजे पालकमंत्र्यांशी चर्चा करूनच एकत्रित निर्णय केलेला असतो. तो भाऊ तुम्हाला समजत नसेल किंवा समजून सुद्धा फक्त विरोधक आहात म्हणून घडलेली घटना गुन्हा, केस न समजता विरोधक म्हणूनच टीका करत आहात.

जरा आपले पुणे, आपली युवा पिढी,चांगले लोकप्रतिनिधी बनून पुणे वाचवू या आणि घडवू या. नुसते राजकीय स्टंट नकोत.त्यामुळे कामाची दिशा भरकट जाते. रवी भाऊ तुम्ही केलेल्या विधानाचा जाहीर निषेधच, असे पाटील यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते रवींद्र धंगेकर…
पुण्यातील पोर्शे कार अपघातावरून रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार
यांच्यावर आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरावे देण्याची मागणी केली होती
यावरून धंगेकर यांनी म्हटले होते की, अजितदादांची भाषा सैल झाली यावरुन दिसते
की, देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना हातपाय बांधून त्या खुर्चीमध्ये ठेवले आहे.

अजितदादांनी कोणत्या अधिकाऱ्यांना आदेश नाही दिले तर ते दादा कुठले? दादा म्हणाले पैसे घेतल्याचे पुरावे धंगेकरांनी आणावेत, ही दादांची भाषा नाही. या कमिशनरला पहिला हाकलून देतो, ही भाषा आहे.

शासकीय प्रश्नांमध्ये अजित पवारांना किती घेतले जाते आणि त्यांचे किती ऐकले जाते हा महत्वाचा भाग आहे.
या प्रकरणापासून अजित पवारांना कोणत्या रोलला कुठे ठेवायचे, कोणता रोल दादांनी करायचा,
हे रोल आणखी दादांना मिळाले नाहीत. त्यामुळे दादा प्रचंड अस्वस्थ आहेत.

अजितदादांना हातपाय बांधून पळायला लावले आहे. पण अजित पवार पळू शकत नाहीत.
त्यामुळे गृहमंत्री फडणवीस यांनीच निर्णय घेतले आहेत.
अजित पवारांनी पुण्यात आल्यापासून कोणाला काही तंबी दिली नाही.
की कोणाला काही आदेश दिले नाहीत, अशी टीका धंगेकर यांनी केली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवाराचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि यंत्रणेचे खास प्रयत्न,
निवडणुकीत ‘समृद्धी’ने डोळे दिपले : संजय राऊत

Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?

Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…