महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी रुपाली ठोंबरे

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहर अध्यक्षपदी रुपाली ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन पक्षाची संघटनात्मक फळी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने शहरातील अनेक मतदार संघात महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रदान केले आहे.

महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालील प्रमाणेः

संगीता तिकोणे य कसबा विधानसभा विभाग अध्यक्षपदी निवड

जयश्री मारणे विभाग अध्यक्ष कोथरुड विधानसभा

अस्मिता शिंदे विभाग अध्याक्षा पर्वती विधानसभा

युगंधरा चाकणकर विभाग अध्यक्षा खडकवासला विधानसभा

लावण्या शिंदे विभाग अध्यक्ष शिवाजीनगर विधानसभा

मनिषा सरोदे विभाग अध्यक्षा पुणे कॅन्टोन्टमेंट

सुरेखा होले शहर सचिव पुणे शहर

उषा काळे शहर सचिव पुणे शहर

पुष्पा कनोजिया शहर सचिव पुणे शहर

ज्योती कोंडे शहर सचिव पुणे शहर