Rupee Co Op Bank | रुपी बँकेच्या दोषी संचालक, अधिकार्‍यांवर कारवाईसाठी उच्च न्यायालयात याचिका

पुणे : Rupee Co Op Bank | रुपी सहकारी बॅंकेचा परवाना रद्द होऊ नये, बॅंकेवर नवीन प्रशासक मंडळ नेमून दोषी संचालक आणि अधिकाऱ्यांवर दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात यावी, यासाठी रुपी बॅंकेच्या कर्मचारी संघटना आणि रुपी संघर्ष समिती यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. दरम्यान मंगळवारी (दि.20) याप्रकरणी सुनावणी होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने रुपी बॅंकेचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले असून या निर्णयाची अंमलबजावणी येत्या गुरुवारपासून (दि.22) पासून होणार आहे. (Rupee Co Op Bank)

रुपी बॅंक कर्मचारी संघटनेतर्फे ऋषीकेश जळगावकर, राहुल आलमखाने आणि रुपी संघर्ष समितीतर्फे नरेश राऊत यांनी याचिका दाखल केल्या आहेत. उच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2017 रोजी दिलेल्या आदेशानुसार रिझर्व्ह बॅंकेने कर्मचारी संघटना, रुपी संघर्ष समिती व रुपी बॅंक यांची सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, रुपी बॅंकेचे सक्षम बॅंकेत विलीनीकर्ण करावे, रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी व निवृत्त न्यायाधीश यांची प्रशासक मंडळावर नेमणूक करावी. थकबाकीदर व दोषी संचालक, अधिकारी यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेची त्वरीत विक्री करावी. रुपी बॅंकेच्या विलीनीकरणासाठी पूर्वी आलेल्या बॅंकांना कोणतेही कारण न देता प्रस्ताव ना मंजूर का करण्यात आले याबाबतचा खुलासा रिझर्व्ह बॅंकेने करावा आणि या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषी मंडळींच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंकेने कर्मचारी संघटना व रुपी संघर्ष समिती यांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्‍यक होते. मात्र रिझर्व्ह बॅंकेने एकतर्फी बॅंक अवसायनाचा आदेश काढला आहे, असे जळगावकर यांनी सांगितले. (Rupee Co Op Bank)

प्रत्येक सहकारी बॅंकेचे दरवर्षी सहकार विभाग आणि रिझर्व्ह बॅंकेतर्फे ऑडिट व तपासणी होत असते, म्हणजेच सहकारी बॅंकांवर दुहेरी नियंत्रण असते. असे असताना देखील सहकारी बॅबॅंका डबघाईला कशा येऊ शकतात. रुपी बॅंकेला 2001 मध्ये ऑडिट अ दर्जा होता. तो 2002 मध्ये एकदम ड दर्जा पर्यंत कसा घसरला गेला, असा सवाल जळगावकर यांनी केला.

Web Title :- Rupee Co Op Bank | Petition in High Court for action against guilty directors, officers of Rupi Bank

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, भाजप नेत्याच्या अध्यक्षतेखाली नेमली मंत्रिमंडळ उपसमिती

Low Blood Pressure झाल्यास ताबडतोब करा ‘या’ 4 पदार्थांचे सेवन, कंट्रोल होईल BP

Fenugreek Benefits | भाजी एक, फायदे अनेक ! शुगर आणि ब्लड प्रेशर सारखे 11 धोकादायक आजार जातील पळून