वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराला ग्रामीण पोलिसांची मारहाण

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

कवडीपाट टोलनाक्यावर केमिकलच्या ट्रकला लागलेल्या आगिचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला ग्रामिण पोलिसांनी मारहाण केल्याची घटना आज (बुधवार) रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. पत्रकार तुकाराम गोडसे यांना आगिच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी वृत्तांकन करण्यासाठी गेले होते. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली असून, पुन्हा एकादा पोलिसांचा मुजोरीपणा समोर आला आहे.

[amazon_link asins=’B0746JXMWV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8e68820b-7f8d-11e8-a847-3196177e93fb’]

तुकाराम गोडसे घटनास्थळी असताना यावेळी  एका लक्झरी गाडीचा ड्रायव्हर व पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची सुरू होती. अचानक या बाचाबाचीचे रुपांतर मारामारीत झाले. त्याचे चित्रीकरण गोडसे करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार इंगळे यांनी पत्रकार गोडसे यांना तू मला न विचारता व्हिडिअो का काढला तू आत्ताच्या आत्ता व्हिडिअो डिलीट कर असे म्हणत गोडसे यांच्या कानशिलात लावली. एवढेच नाही तर त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. अनेकदा गोडसे मी पत्रकार अाहे माझे अोळखपत्र पहा असे सांगत होते. तरी देखील त्यांचा मोबाईल पोलिसांनी अर्धा तास परत दिला नाही. पोलिसांच्या दमदाटीपणाचा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मागील काही दिवसापासून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यामध्ये वाढ होत आहे. तुळजापूरमध्ये देखील पत्रकाराला पोलिसांनीच मारहाण केल्याची घटना घडली होती. पत्रकार हा लोकशाहीचा चाैथा स्तंभ आहे. जर पोलीस प्रशासन कायदा हातात घेऊन असे कृत्य करीत असेल तर सामान्य नागिराकांसोबत कसे वागत असतील असा सवाल निर्माण झाला आहे.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’93e625ec-7f8d-11e8-977a-2bfba8e81a82′]

तरी लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी इंगळे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून कठोर शिक्षा व्हावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like