Rutuja Latke | भाजपने माघार घेतली तरी ऋतुजा लटके यांच्याविरोधात अन्य सहा उमेदवार रिंगणात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri By-Election) मुख्य लढत दोन पक्षांत होणार होती. एक म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे- Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि दुसरे भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे संयुक्त उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel). पण भाजपने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आता भाजपने (BJP) जरी माघार घेतली असली, तरी या निवडणुकीत ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या विरोधात इतर सहा उमेदवार उभे आहेत.

 

आज (दि.17) रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार अर्ज दाखल केलेल्या 14 उमेदवारांपैकी 7 जणांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. यामुळे आता 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या विरोधात अन्य सहा उमेदवार रिंगणात असणार आहेत.

 

अर्ज मागे घेतलेले उमेदवार

1. निकोलस अल्मेडा Nicolas Almeida (अपक्ष-Independent)
2. मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पक्ष)
3. साकिब जफर ईमाम  मल्लिक Saqib Zafar Imam Mallick (अपक्ष)
4. राकेश अरोरा Rakesh Arora (हिंदुस्थान जनता पक्ष-Hindustan Janata Party)
5. चंद्रकांत रंभाजी मोटे Chandrakant Rambhaji Mote (अपक्ष)
6. पहल सिंग धन सिंग आऊजी Pahl Singh Dhan Singh Auji (अपक्ष)
7. चंदन चतुर्वेदी Chandan Chaturvedi (अपक्ष)

 

अंतिम यादितील उमेदवार

1. ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
2. बाला व्यंकटेश विनायक नाडार Bala Venkatesh Vinayak Nadar (आपकी अपनी पक्ष- पीपल्स-Aapki Apni Paksha- Peoples)
3. मनोज श्रावण नायक Manoj Shravan Nayak (राईट टू रिकॉल पक्ष-Right to Recall Party)
4. नीना खेडेकर Neena Khedekar (अपक्ष)
5. फरहाना सिराज सय्यद Farhana Siraj Syed (अपक्ष)
6. मिलिंद कांबळे Milind Kamble (अपक्ष)
7. राजेश त्रिपाठी Rajesh Tripathi (अपक्ष)

 

 

Web Title :- Rutuja Latke | andheri east bypoll election on 3 november rutuja latake and other 6 six candidate in andheri election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा