Devendra Fadnavis | ‘काहींनी प्रत्यक्ष विनंती केली, तर काहींनी…’, विरोधकांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीतून (Andheri By-Election) भाजपने यशस्वी माघार घेतली आहे. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. आता या महत्वपूर्व निर्णयाचे साक्षिदार असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही वेळी संवेदनशील निर्णय घ्यावे लागतात, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात आम्ही बराच विचार केला. कार्यकर्त्यांचे मत होते, आम्ही निवडणूक लढविली पाहिजे. भाजप मुंबई प्रदेशचे देखील तेच मत होते. अपक्ष असून देखील 45 हजारांपेक्षा अधिक मते मिळविणारा उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) आम्ही उभा केला. त्यामुळे आम्हाला निवडून येण्याची पूर्ण खात्री होती. तथापि काहींनी आम्हाला विनंती केली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी समोरुन विनंती केली.

 

काहींनी प्रत्यक्ष विनंती केली, तर काहींनी मागून अप्रत्यक्ष विनंती केली. आता मागून कोणी विंनती केली, हे विचारु नका. राजकारणात सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात. पण ज्यांनी कोणी केली, त्यावर विचार करुन मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि आमच्या वरिष्ठांसोबत बोललो आणि निर्णय घेतला, असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

या निर्णयामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. कारण ते लढा द्यायला तयार होते.
आम्हाला काही प्रथा परंपरा पाळाव्या लागतात.
परिस्थितीला अनुसरुन संवेदनशील निर्णय घ्यावे लागतात.
काही लोक छोट्या मनाचे असतात.
त्यामुळे तुम्ही काहीही निर्णय घेतला, तरी ते बोलत असतात. पण आता ते जे काही बोलले आहेत,
त्याला उत्तर ग्रामपंचायतीच्या निकालाने दिले आहे, असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | deputy chief minister devendra fadnaviss first
reaction after bjps withdrawal from the andheri by elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा