Naresh Mhaske | रमेश लटके हयात असते, तर ते आमच्या भूमिकेशी सहमत असते – नरेश म्हस्के

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा (Andheri By-Election) मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण भाजपने (BJP) या निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. त्यावर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज जर रमेश लटके (Ramesh Latke) हयात असते तर ते आमच्या भूमिकेशी सहमत असते, असे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी म्हंटले आहे.

 

आम्हा सर्व आमदारांचे म्हणणे होते की, भाजपने सहानुभुतीपूर्वक अंधेरीच्या पोटनिवडणुकीचा विचार करावा. वरिष्ठांनी आमचे म्हणणे ऐकले आणि आमच्या मागणीचा विचार केला. त्याबद्दल आम्ही पक्षश्रेष्ठींचे आभार मानतो. आज रमेश लटके हयात असते, तर त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना साथ दिली असती. रमेश लटके आमच्या भूमिकेशी सहमत असते, असे म्हस्के (Naresh Mhaske) म्हणाले.

 

दरम्यान, भाजपच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने या मतदार संघात सर्वेक्षण केले असता, त्यांना कळाले की, ऋतुजा लटके (Rutuja Latke) या बहुमताने निवडून येणार आहेत. त्यांच्यासमोरील उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांचा दारुण पराभव भाजपला दिसत होता. त्यामुळे त्यांनी माघार घेतली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पत्र हा केवळ स्क्रिप्टचा भाग आहे, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील पत्रकार परिषद घेत ही निवडणूक बिनविरोध करण्यास सांगितले होते.
अखेर भाजपने आपला उमेदवार मागे घेण्याचे जाहीर केले आहे.

 

Web Title :- Naresh Mhaske Had Ramesh Latke been alive, he would have agreed with our position – Naresh Mhaske

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | भाजपच्या माघारीनंतर शरद पवार पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर बोलले, म्हणाले- ‘माझी भाजपकडे मागणी नव्हती, तर…’

Sanjay Raut | राज ठाकरेंचे भाजपला दिलेले पत्र हा केवळ स्क्रिप्टचा भाग, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

Mandakini Khadse | जळगाव दूध संघातील अपहार प्रकरणात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल