Sachin Sawant | ‘सर आली धावून, भाजप ऑफिस गेले वाहून!’, पुण्यातील रस्त्यावर साचलेल्या पाण्यावरुन सचिन सावंतांचा भाजपला खोचक टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील दोन दिवसांपासून पुण्यात (Rain in Pune) मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने याचा परिणाम वाहतुकीवर (Traffic) होत आहे. पुण्यातील रस्त्यावर साचलेल्या पाण्यावरुन काँग्रेस (Congress) नेते सचिन सावंत (Sachin Sawant) भाजपच्या कारभारावर खोचक टीका केली आहे. सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजप कार्यालयासमोरील रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा व्हिडिओ ट्विट करत पुणे भाजप (Pune BJP) आणि महपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) भोंगळ कारभारावर टीका केली आहे.

सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘येरे येरे पावसा, पुणे पालिकेचा खाल्ला पैसा, पैसा मिळाला मोठा, #भाजपा ठरला खोटा, ये गं ये गं सरी, #भाजपा खिसे भरी, सर आली धावून, भाजप ऑफिस गेले वाहून!’ अशा शब्दात सावंत यांनी भाजपवर खोचक शब्दात टीका केली आहे. सावंत यांच्या टीकेला भाजप कशा पद्धतीने प्रत्युत्तर देते हे पहावे लागणार आहे.

दरम्यान, मागील दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे पुण्यातील रस्ते जलमय होत आहेत,
मात्र यामध्ये पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार समोर येत आहे. पुण्यातल्या मुख्य रस्त्यांवर पाणी साचत आहे.
सर्व ड्रेनेज लाईन तुंबलेल्या आहेत. जंगली महाराज रोड (JM Road), मॉडर्न कॉलनी (Modern Colony),
आपटे रस्ता (Apte Road) या रोडवर मोठ्या पाणी साचत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

हवामान विभागाने (Meteorological Department) आज (मंगळवार) कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड,
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे (घाट), सातारा (घाट), औरंगाबादसाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.
पुण्यात होणाऱ्या पावसाने रस्त्यावर पाणी साचत असून काही ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत.

Web Title :- Sachin Sawant | Congress Leader Sachin Sawant Pune Municipal Corporation PMC BJP Office Rain Roads In Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ashish Shelar | राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून राज्य सरकारला 12 हजार कोटींचा दंड, आशिष शेलारांनी साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा

MLA Ravi Rana | ‘अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग ठाकरे सरकारसाठी वसूली करत होत्या’; रवी राणांचा गंभीर आरोप