Sachin Sawant | राज्यांना कमकुवत करुन संपूर्ण देशाला एका रंगात रंगविणे लोकशाहीला घातक – काँग्रेस

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकार (Central Government) एकाच राज्यासाठी काम करत असल्याची तक्रार विरोधी पक्षांनी केली आहे. महाराष्ट्रातून गेल्या चार महिन्यात चार प्रकल्प राज्याबाहेर गेले असल्याने विरोधकांनी भाजपशासीत राज्य आणि केंद्र सरकारवर टीकांचा भडीमार केला आहे. काँग्रेस नेते (Congress Leader) सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी यावर भाष्य केले आहे. राज्यांना कमकुवत करणे, केंद्राला ताकदवान बनविणे आणि संपूर्ण देशाला एका रंगात रंगविणे लोकशाहीला घातक आहे, असे सचिन सावंत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व राज्यांच्या गृहमंत्र्याचे एक चिंतन शिबीर आयोजित केले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण देशातील पोलीस दलासाठी एक राष्ट्र, एक गणवेश (One Nation One Uniform) ही कल्पना मांडली. ही केवळ विचारासाठी सूचना असून, कोणत्याही राज्यावर ती लादण्यात येणार नाही, असे मोदींनी यावेळी स्पष्ट केले. त्यावर काँग्रेसने याला विरोध केला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीट करत आपली मते मांडली आहेत.

“राज्यांचे पोलीस दल (Police Force) त्या राज्याची ओळख असते. ती ओळख पुसण्याची कल्पना संघराज्य प्रणालीच्या विरोधात आहे. राज्यांना कमकुवत करुन केंद्र ताकदवर होणे, देशाला एकाच रंगात रंगवणे, विविधता शक्ती असलेल्या देशातील लोकशाही व संविधान दोघांसाठी घातक आहे” तसेच “कायदा सुव्यवस्था हा संविधानातील राज्य सूचीतील विषय म्हणजेच प्रामुख्याने राज्यांची जबाबदारी आहे. तरी देखील केंद्रीय यंत्रणांचा सुळसुळाट करुन राज्य तपास यंत्रणांना मोदी सरकार निष्प्रभ बनवत आहे. हे देखील संघराज्य प्रणालीच्या विरोधात आहे.” असे सावंत यांनी ट्वीट करत म्हंटले आहे.

कायदा आणि सुवव्यस्था हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असून देखील मोदी सरकार राज्यातील प्रकरणांत
वाजवीपेक्षा जास्त हस्तक्षेप करत आहे. देशातील प्रत्येक राज्यात एनआयएचे कार्यालय आहे.
त्यामुळे कुठेतरी राज्यांच्या सार्वभौमत्वावर गदा येत असल्याचे सचिन सावंत यांनी म्हंटले आहे.
तसेच विविधतेत एकता ही आपल्या देशाची ओळख असून देखील केंद्र सरकार एक रंगाचा अट्टहास करत
असल्याचे सचिन सावंत यांचे मत आहे.

Web Title :- Sachin Sawant | congress sachin sawant slams modi government over same police uniform

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | टाटा एअरबस प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Nitin Gadkari | गडकरींनी भरदिवसा मुंबईकरांना दाखवलं स्वप्न, ‘200 प्रवासी घेऊन डबल डेकर बस उडणार’