Nitin Gadkari | गडकरींनी भरदिवसा मुंबईकरांना दाखवलं स्वप्न, ‘200 प्रवासी घेऊन डबल डेकर बस उडणार’

मुंबई : स्वप्नवत वाटाव्यात अशा पायाभुत सुविधांच्या घोषणा करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील वाहतुक कोंडी (Traffic Jam) दूर करण्यासाठी उडणारी बस आणणार असल्याचे म्हटले होते, आता त्यांनी मुंबईकरांना सुद्धा असेच स्वप्न दाखवले आहे. मुंबईत हवेत उडणारी डबल डेकर बस (Flying Double Decker Bus ) पाहिजे, त्यासाठी अभ्यास करत आहोत, असे गडकरींनी म्हटले आहे. पवई ते नरिमन पॉईंट (Powai to Nariman Point) असा मुंबईकरांचा हवेतून प्रवास होईल, असे स्वप्न भरदिवसा गडकरींनी (Nitin Gadkari) मुंबईकरांना दाखवले. आयआयटीच्या (IIT) विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, मास रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटीचा (Mass Rapid Transport of Electricity) वापर व्हावा. बंगळुरुत इतका ट्रॅफिक जाम आहे, इतके प्रदूषण आहे की, मी तिथल्या मुख्यमंत्र्यांना सांगितले, आमच्याकडे एक प्रेझेंटेशन झाले, हवेत उडणारी डबल डेकर बस, मुंबईत अशीच पाहिजे, ती बनवण्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत. 200 लोक वरच्या वर हवेतून जाणार.

गडकरी म्हणाले, पवईतून डोंगराच्या वरुन निघून नरीमन पॉईंटला वरच्या वर जाणार, तुमचा प्रवास सुलभ होईल आणि वेळही वाचेल, वाहतूक व्यवस्थेत नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर व्हायला हवा. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी उडत्या बसचा पर्याय सुचविला होता. केंद्र सरकार (Central Government) निधी द्यायला तयार आहे, महापालिकेने तसा प्रस्ताव द्यावा, असे त्यांनी म्हटले होते.

पुण्यात ते म्हणाले होते की, देशभर 165 रोप वे आम्ही बांधत आहोत. त्यासाठी महाराष्ट्रातील काही प्रस्ताव आहेत.
पुणे शहराच्या वाहतूक कोंडीचा पीएमआरडीने अभ्यास करावा. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे.
120 ते 150 लोक त्यातून प्रवास करु शकतात. लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी एकत्र बसून चर्चा करावी.
निधीची चिंता नाही. केंद्र सरकार निधी द्यायला तयार आहे.

हवेत उडणारी बस, रोप-वे कार, टोलनाके कायमचे बंद, यासारख्या ’उडत्या’ घोषणांमुळे नितीन गडकरी नेहमीच
चर्चेत असतात. काळाच्या पुढची पावले ओळखून काम करणारे, जलदगती निर्णय घेणारे द्रष्टे मंत्री म्हणून ते
ओळखले जात असले तरी त्यांच्या अनेक लोकप्रिय घोषणा केवळ ’हवेतच’ विरणार की काय, अशी भीती व्यक्त होत
असते.

Web Title :-  Nitin Gadkari | union minister nitin gadkari speech at iit mumbai campus shares dream of flying double decker bus in mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | टाटा एअरबस प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Rohit Patil | ‘पवार कुटुंबातील आवडता नेता कोण? शरद पवार की अजित पवार?’ रोहित पाटील यांचे खुमासदार उत्तर

Jaya Bachchan | जया बच्चन यांचा नातीला अजब सल्ला, ‘लग्न न करताही तू आई बनू शकतेस’