Sachin Vaze-Anil Deshmukh | पोलिस खात्यातून बडतर्फ झालेला अधिकारी माजी गृहमंत्र्यांना सवाल विचारतो तेव्हा…; अनिल देशमुख म्हणाले….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sachin Vaze- Anil Deshmukh | मागील काही महिन्यामध्ये मुंबईचे प्रसिद्ध व्यापारी मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder Case) आणि अँटिलिया प्रकरणावरून (Antilia Case) राज्यात खळबळ उडाली. याप्रकरणी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) हे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले. सध्या ते अटकेत आहेत. यानंतर अनेक मोठ्या घडामोडी देखील घडल्या. दरम्यान आता थेट न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने खुद्द राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना काही सवाल केले आहेत. त्यावेळी वाझेंना अनिल देशमुख यांना सवाल विचारण्यासाठी परवानगी दिली. यामुळे आता चर्चेला उत आला आहे. (Sachin Vaze-Anil Deshmukh)

सचिन वाझेने अनिल देशमुखांना विचारलेले सवाल –

सचिन वाझे – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात 30 मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या GR चा तुम्ही भाग होता का ?

अनिल देशमुख – परमबीर सिंह यांनी माझ्यावर लावलेल्या आरोपांना कोणताही आधार नसून ते राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं होतं

सचिन वाझे – तुम्ही 30 मार्चच्या सरकारी ठरावाचा भाग होता का ?

अनिल देशमुख – मी मुख्यमंत्र्यांना समिती नेमण्याची विनंती केली होती.

सचिन वाझे – तुम्हाला GR बद्दल कधी कळले ?

अनिल देशमुख – हा GR पब्लिक डोमेनमध्ये आला तेव्हा कळले.

सचिन वाझे – स्पेशल IG आणि आयजीमध्ये काही फरक आहे का ?

अनिल देशमुख – मला याचं उत्तर द्यायचं नाही.

सचिन वाझे – मुंबई पोलीस आयुक्तांनी DGP ना अहवाल द्यावा असे म्हणणे योग्य ठरेल का ?

अनिल देशमुख – नियमांनुसार करावं लागतं. (Sachin Vaze-Anil Deshmukh)

सचिन वाझे – गुन्हे शाखेचे सहआयुक्तांना आयुक्त, DGP , एसीएस होम यांना अहवाल द्यावा लागतो ?

अनिल देशमुख – केवळ आयुक्तांनाच.

सचिन वाझे – हेमंत नगराळे मुंबईचे आयुक्त होण्यापूर्वी DGP होते ?

अनिल देशमुख – हो

सचिन वाझे – मला CIU चा मुख्य प्रभारी बनवण्यात आल्याचे तुम्हाला कधी कळले ?

अनिल देशमुख – मला काही तक्रारी आल्या की, वाझे यांना 14-15 वर्षांसाठी निलंबित करून त्यांना CIU चा प्रभारी बनवण्यात आलं. साधारणत: सहसा, निलंबित अधिकाऱ्याला साइड पोस्टिंग दिले जाते, जरी ते साइड पोस्टिंगवर होते, पण एक दिवसासाठी. परमबीर सिंग यांच्या तोंडी आदेशानंतर वाझे यांना CIU चे प्रभारी बनवण्यात आले. यानंतर सह आयुक्त गुन्हे संतोष रस्तोगी यांनीही विरोध केला.

सचिन वाझे – तुम्ही सांगू शकता की, असा काही नियम आहे की, ज्या अंतर्गत API ला युनिटचा प्रभारी बनवता येत नाही

अनिल देशमुख – एखादा नियम असेल.

सचिन वाझे – तुम्हाला भेटीबद्दल कधी कळालं ?

अनिल देशमुख – सचिन वाझेला CIU इन्चार्ज 10 जून रोजी केलं होतं. मला काही दिवसांनी तक्रारी मिळाल्या तेव्हा समजलं.

सचिन वाझे – कोणी तक्रार केली ?

अनिल देशमुख – अनेक तक्रारी तोंडी होत्या पण कदाचित अनेक लेखी तक्रारीही विभागाकडे आल्या आहेत.

Web Title :- Sachin Vaze-Anil Deshmukh | ex police officer sachin waze directly questioned former home minister anil deshmukh before the chandiwal commission

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा