… अन् ‘त्या’ एका चुकीमुळे सचिन वाझेचा संपूर्ण डाव त्याच्यावरच उलटला

पोलीसनामा ऑनलाइन – अंबानीच्या घराजवळ स्फोटक आढळल्याप्रकरणी NIA ने अटक केलेल्या सचिन वाझेचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता वाझेची चौकशीची गरज नाही, असे NIA ने कोर्टात सांगितल्याने 27 दिवसांच्या कोठडीनंतर शुक्रवारी (दि. 9) त्याची तळोजा जेलमध्ये रवानगी केली आहे. वाझेना आता 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी आहे.

पण त्याचवेळी NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटक प्रकरणानंतर वाझेंनी आणखी एक डाव आखला होता. तो म्हणजे या प्रकरणानंतर काही दिवसांनी एका Encounter ची त्याने प्लॅनिंग केली होती. मात्र स्फोटकामुळे या प्रकरणाला दहशतवादी वळण लागल्याने तपासात NIA आणि ATS एन्ट्री झाली. त्यामुळे वाझेचं संपूर्ण प्लॅनिंग फसल अन् त्याचा डाव त्याच्यावरच उलटला. वाझेला या प्रकरणात NIA ने अटक केली. त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत गेले. अखेर वाझेविरोधात भक्कम पुरावे NIA ने गोळा केले.

अंबानीच्या घराबाहेर स्फोटक असलेली कार ज्या लोकांनी उभी केली, ते Encounter मध्ये मारले गेले असा बनाव वाझे करणार होता. मात्र , या Encounter मध्ये मनसुख हिरेन याला मारले जाणार होते की आणखी कोणतं नाव सामील होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही.सूत्रांच्या माहितीनुसार, Encounter साठी 2 अन्य व्यक्तींची ओळखही केली होती. Encounter नंतर स्फोटक प्रकरणाचा तपास संपला असता. या प्रकरणाचा तपास स्वत: वाझे करत होता.

मात्र तपासात NIA आणि ATS आल्याने वाझेचा डाव त्याच्यावरच उलटला. तसेच नोव्हेंबरमध्ये औरंगाबादमधून एकाची कार चोरीला गेली होती. वाझेच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशनमध्ये त्या कारचा नंबरप्लेट मिठी नदीतून बाहेर काढला गेला. कदाचित याच गाडीतून आरोपी आल्याचे दाखवण्यात येणार होता असा सूत्रांचा अंदाज आहे. याच कारचा नंबरप्लेट 4 मार्च रोजी आणि मुंबईत काही सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. 4 मार्चला हिरेन यांची हत्या झाली होती.

वाझेला जेलमध्ये पाठवण्याअगोदर शुक्रवारी CBI ने NIA कार्यालयात जाऊन अनिल देशमुख प्रकरणात चौकशी केली. NIA ने वाझेकडून जे पुरावे गोळा केले होते. ते सीबीआयसोबत शेअर केलेत. या प्रकरणात अनेक खुलासे झाले असले तरी आणखी काही खुलासे बाकी आहेत. एवढा मोठा डाव फक्त सचिन वाझे एकटा करू शकत नाही. मग त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? स्कोर्पिओमध्ये ठेवलेलं जिलेटिन कोणी आणि कधी आणल याचा खुलासा होणं बाकी आहे. तसेच वाझे यांचे पत्र लीक झाल्याबद्दल NIA कोर्टाकडे तक्रार केली होती. त्यावर कोर्टाने वाझेंच्या वकिलांना फटकारले आणि आतापासून तसे होऊ नये अशी कडक सूचना दिली आहे.