सांगलीत गुंजभर सोन्यासाठी रक्ताच्या नात्यालाच काळिमा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सोन्याच्या दागिन्यांसाठी रक्ताच्या नात्यालाच एका गावात काळीमा फासणारा प्रकार सांगली शहरानजीक एका गावात घडला आहे. पाच दिवस अत्यंस्काराविना पडून राहिला मृतदेहावर अखेर इन्साफ फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अत्यसंस्कार केले. मात्र, ती आजी गेल्याचे दुःखही त्याच्या रक्तातील नातलगांना नसून आजीजवळ असणार्‍या सोन्याची चौकशी केली.

सत्तरी गाठलेली आजी एकटीच राहत होती. तिला चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मात्र, काही कारणास्तव त्या आजीला या वयात एकटच राहणे भाग होते. दोनवेळच्या भाकरीची व्यवस्था करत ती आयुष्य जगत होती. पैशांची कमतरतेमुळे व्याधींकडे लक्षच दिले नाही. अखेर पाच दिवसापूर्वी त्या आजीचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे कुटुंबियांनाही माहिती नसावे इतकी दुर्दैवी बाब त्या आजीच्या नशीबी आली. पाच दिवसानंतर आजी दिसून न आल्याने शेजापारी राहणार्‍यांनी चौकशी केली.

त्यावेळी तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यानंतर महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनाही याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तातडीने इन्साफचे प्रमुख मुस्तफा मुजवार यांना कळविले. मुस्तफा टीम घेवून तातडीने रवाना झाला. कुजलेल्या अवस्थेत असलेला तो मृतदेह अत्यसंस्कारासाठी घेवून जाताना कुटुंबातील एकास आजीची आठवण आली. नातू धावत आला काही विचारण्यापूर्वीच त्याने आजी जवळील सोन्याची विचारणा केल्यामुळे सार्‍यांनाच धक्का बसला. अखेर त्याला तेथून हाकलून देण्यात आले. नात्यांना काळीमा फासणारी ही घटना शहरानजीक घडल्याने वार्‍यासारखी पसरली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like