#Video : मुख्यमंत्री ज्या ठिकाणाहून निवडणूक लढविण्यास सांगतील, तेथून मी लढणार : सदाभाऊ खोत

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रयत क्रांती संघटनेकडून तयारी करण्यात येत आहे. हे लक्षात घेता आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. पण मुख्यमंत्री ज्या विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढविण्यास सांगतील तेथून मी निवडणूक लढविणार असल्याची भूमिका कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मांडली.

तर राजू शेट्टी आणि माझ्यात वैयक्तिक काही वाद नव्हते तर तत्वावर वाद होते. तसेच माझा आणि त्यांचा विधानसभा मतदारसंघ वेगळा असल्याने विरोधात लढण्याचा प्रश्नच येत नाही. ते जरी आज खासदार नसतील तरी त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विधानसभा त्यांच्या विरोधात लढणार का या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणी च्या बैठकीत दहा ठराव करण्यात आले. या बैठकीनंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अनेक प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

 

यावेळी ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी पुढील महिनाभर राज्यभरात विविध ठिकाणी जाऊन आढावा घेणार आहे. त्यानंतर एक अधिवेशन घेऊन संघटनेचा उमेदवार देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच आम्ही महायुती सोबत असल्याने त्या जागा वाटपा बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत देखील चर्चा केली जाईल असे त्यांनी सांगितले.