सहकारी बँक घोटाळा प्रकरण : FIR दाखल झाल्यानंतर शरद पवारांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर ईडीने गु्न्हा दाखल केला आहे असं वृत्त आहे. नुकतीच विधानसभेची तारीख जाहीर झाली आहे. अशात हे गुन्हे दाखल होणं म्हणजे राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे असं मानलं जात आहे. या नेत्यांनी नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यानंतर आता शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचे माहिती नाही. दौऱ्याला प्रतिसाद मिळत असल्याने माझ्यावर कारवाई होत आहे.” असे शरद पवारांनी म्हटले आहे.

‘माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाही’
वृ्त्तवाहिनीशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचे माहिती नाही. दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने माझ्यावर कारवाई होत आहे. राज्य सहकारी किंवा कोणत्याही बँकेचा मी संचालक नव्हतो. माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे तर स्वागत करतो. माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाही” असा दावाही त्यांनी केला.

नेमकं प्रकरण काय?
नियमबाह्य कर्ज वाटप केल्याप्रकरणी अण्णा हजारे यांनी तीन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अतिशय मनमानीने कर्ज वाटप केले होते. त्यामुळे या बँकेला 10 हजार कोटींचं नुकसान झालं होतं. अण्णा हजारे यांनी याचिका दाखल केल्यानंतर या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीच्या अहवाल सादरीकरणानंतर या प्रकरणी गु्न्हे दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले. यानंतर अजित पवारांसह तब्बल 31 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा समावेश होता. ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केल्याने आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे.

Visit : policenama.com