Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | महापौर मुरलीधर मोहळ यांच्या वतीनेलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe) यांची जयंती आज उत्साहात पार पडली. पुण्यातील सारसबाग येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या (Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe) पुतळ्याला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (mayor murlidhar mohol) यांच्या हस्ते पुष्पहार घालून सकाळी १० वा. या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर सुनीता वाडेकर, स्वागताध्यक्ष राजाभाऊ धडे, सचिव संजय केंदळे, सुजित रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

पहाटेपासूनचं सारसबाग येते पुणे जिल्ह्यातील विविध संघटनांनी अण्णा भाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन सदरील कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. या ठिकाणी पुणे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री विश्वजित कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मा. आमदार मोहन जोशी,
झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, नगरसेवक सुभाष जगताप,
सचिन जोगदंड, निलेश वाघमारे, दत्ता जाधव, आनंद शिंदे, रविभाऊ दयानंद,
ऍड. महेश सकट, ऍड राजश्री अडसूळ आदी मान्यवरांनी अण्णा भाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Web Title : Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | On behalf of Mayor Murlidhar Mohal, polite greetings to Lokshahir Anna Bhau Sathe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Pune Crime | पुण्यातील नांदेड सिटीमध्ये नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या 17 वर्षीय श्रीया पुरंदरेची आत्महत्या, प्रचंड खळबळ

ICICI Bank ने आजपासून केला मोठा बदल, ग्राहकांना खर्च करावे लागतील जास्त पैसे; जाणून घ्या

Modi Government | खुशखबर ! नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल 7 लाखांची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?