Sai Tamhankar | मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आहे एवढ्या कोटींची मालकीण जाणून घेऊया तिच्याबद्दल

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री सई ताम्हणकरची (Sai Tamhankar) ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र’ ही वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सईने आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांचे मन जिंकले आहेत. सईने केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहे. सई आपल्या अभिनयाबरोबरच ब्युटीफूल ग्लॅमर लुक मुळे देखील ओळखली जाते. सोशल मीडियावर सई नेहमीच सक्रिय असते. सई (Sai Tamhankar) दररोज तिचे नवनवीन लूक चाहत्यांसाठी शेअर करत असते.

सईने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका उत्तमरीत्या साकारल्या आहेत.२०१३ साली सईला दुनियादारी या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत एक नवी ओळख मिळवून दिली आहे. तर सईची ‘पेठ पुराण’ ही वेब सिरीज देखील प्रेक्षकांच्या पसंतीस आली होती. तसेच तिचा ‘मीडियम स्पायसी’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सईने महाविद्यालयीन कॉलेजमध्ये असताना देखील अनेक आंतरमहाविद्यालयीन नाटकात भाग घेतले होते. तर सईला नुकतेच IIFA पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे.

सईने (Sai Tamhankar) स्वतःला केवळ एका चौकटीत बांधून ठेवले नाही तर ती खुल्या आकाशात उडण्यासाठी नेहमीच सज्ज असते. सईचे आजवर आलेले अनेक चित्रपट वेब सिरीज प्रेक्षकांना आजही लक्षात आहेत. तर आता प्रेक्षक सईच्या पोस्टकार्ड फ्रॉम महाराष्ट्र या वेब सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. सईची नेटवर्थ 2 कोटींच्या घरात आहे. सईला नेहमीच विविध भूमिकातून नवनवे प्रयोग करायला आवडत असतात. तिची हीच आवड प्रेक्षकांना नेहमीच तिच्याकडे खेचून घेऊन येत असते. तर सईने स्वतःची बोल्ड प्रतिमा मोडून काढायला अनेक गंभीर भूमिका देखील केल्या आहेत.

Web Title :- Sai Tamhankar | know about duniyadari fame marathi actress sai tamhankar she is the owner of crores

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jannat Zubair Rahmani | अभिनेत्री जन्नत जुबेरच्या परफेक्ट फिगरवर खिळल्या चाहत्यांच्या नजर

Bigg Boss 16 | फिनालेपूर्वी अभिनेत्री टीना दत्ता झाली बेघर; चाहत्यांना बसला मोठा धक्का

Rani Chatterjee | भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने ‘तो’ निर्णय घेतला मागे; लवकरच झळकणार ‘या’ मालिकेत