
Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरच्या कॅट स्टाईल लूकने चाहते घायाळ ; फोटो वायरल
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sai Tamhankar | मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. सई तिच्या उत्तम अभिनयासोबतच हटके फॅशन सेन्स आणि स्टाईल मुळे देखील ओळखली जाते. सईने आजवर अनेक मालिका, वेब सिरीज आणि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सई सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. (Sai Tamhankar)
सई नेहमीच आपल्या फॅशन सेन्समुळे सगळ्यांना घायाळ करत असते. सईने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. जे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करून कमेंट बॉक्स फुल केले आहे. या फोटोमध्ये सईने कॅट स्टाईल केला आहे. यामध्ये तिने बेज कलरचा बॉडी हगिंग ड्रेस परिधान करत ब्लॅक हिल आणि बो हेअर स्टाईल कॅरी केला आहे. या फोटोमध्ये तिने न्यूड मेकअप करत आपला लुक पूर्ण केला आहे. (Sai Tamhankar)
सईचे सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर्स आहेत. मराठी सोबतच हिंदी विश्वात देखील सईचे खूपच चाहते वर्ग आहेत. सध्या हे फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तर या फोटोज वर सईच्या चाहत्यांनी हार्ट आणि फायर च्या इमोजी शेअर करत कमेंट चा वर्षाव केला आहे. सईने आजवर ‘दुनियादारी’, ‘बालक पालक’, ‘तू ही रे’, ‘धुराळा’, ‘गर्लफ्रेंड’, ‘पुणे 52’, ‘क्लासमेट्स’ इत्यादी चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
Web Title :- Sai Tamhankar | saie tamhankar shared new look see her latest photoshoot here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…