पोलीसनामा ऑनलाईन टीम – Saif Ali khan | बॉलीवूडमध्ये एकेकाळी सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंहची (Amrita Singh) जोडी चांगलीच चर्चेत होती. अभिनेत्री अमृताला पाहताच सैफ तिच्या प्रेमात पडला होता. एका फोटोशूटच्या दरम्यान त्या दोघांची पहिली भेट झाली होती. त्या दोघंचा पहिल्याच भेटीचा एक किस्सा अगदी गमतीदार असून, एका मुलाखतीमध्ये तो सांगितला होता.
सैफ अली खान हा अभिनेत्रीवर अगदी पहिल्याच भेटीमध्ये फिदा झाला होता. लगेचच त्यानं तिला डेटवर येण्यासाठी विचारलं. मात्र डेटवर नाही म्हणत तिनं (Amrita Singh) चक्क सैफला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. तसेच सैफ चक्क दोन दिवस अमृताच्या घरी थांबला आणि जेव्हा निघण्याची वेळ आली, तेव्हा त्याचा खिसा पूर्णपणे मोकळा झाला होता. त्याचाकडे घरी जाण्याएवढे देखील पैसे शिल्लक नव्हते.
मात्र, सैफनं अमृताकून 100 रूपये उधार मागितले. तिनं पैसे न देताच, सैफला कारच्या चाव्या दिल्या. कार घरी घेऊन जाण्यास सांगितली. परंतु त्यानं तिला सांगितलं, मला प्रोडक्शन हाऊसची कार सोडेल. तरीदेखील अमृतानं कारच्या कारणानं तो पुन्हा भेटायला येईल म्हणून तिची कार नेण्यास सांगितली.
दरम्यान, अमृता आणि सैफचा (Saif Ali khan) विवाह 1991मध्ये झाला होता. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे 2004 मध्ये ते दोघं एकमेकांपासून विभक्त झाले. त्यांना सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) ही दोन मुलं आहे.
Web Title :- Saif Ali Khan | saif ali khan borrowed 100 rupees on his first date with amrita singh know-why
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Kiara Advani | कियारा आडवाणीनं घेतली Audi कार… किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क…!