UPSC : मुलाखतीत विचारलं हिंदू-मुस्लिमांमध्ये कोणाला साथ देणार ? ‘या’ उत्तरामुळं झालं ‘सलेक्शन’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UPSC परीक्षेची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर प्रत्येकाला एक मुलाखत द्यावी लागते यावेळी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त चालू घडामोडींवर देखील प्रश्न विचारले जातात. 2017 मध्ये 350 व्या रँक ने पास झालेल्या साक्षी गर्गने दिलेल्या प्रश्नाचे उत्तर ऐकून मुलाखत घेणारे खुश झाले. साक्षी सध्या भारतीय महसूल विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून काम करते आहे.

साक्षीने सांगितले की त्यांना मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला होता की समजा उत्तर प्रदेशमधील एका जिल्ह्यामध्ये तुमची जिल्ह्या न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि अशा वेळेस एके दिवशी तुमच्याकडे हिंदू समाज येतो आणि रामनवमीसाठी उत्सव फेरी काढणार असल्याचे सांगतो आणि त्याच वेळी मुस्लिम समाज देखील उत्सव फेरी काढणार असल्याचे सांगतात मग अशा वेळेस तुम्ही जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून काय कराल ?

UPSC: इंटरव्यू में पूछा हिंदू-मुस्लिम में किसका देंगी साथ? इस जवाब से सेलेक्ट

यावर साक्षी यांनी उत्तर दिले की, मी दोनीही समाज्याच्या भावनांचा सन्मान करते कारण दोहींनी गट आपल्या आपल्या समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यामुळे मी त्यांच्या नेतृत्वाशी याबाबत चर्चा करेल.
त्यांनी सांगितले की मी त्यांना म्हणेल, एकत्र तुम्ही रामनवमी आणि ताजिया उत्सवासाठी वेगवेगळे रस्ते निवड किंवा जर एकाच रस्त्यांवरून जाणार असाल तर मी दोनीही समुदायाच्या लोकांना वेगवेगळ्या वेळेत कार्यक्रम करण्यास सांगेल कारण दोनीही समुदायाच्या लोकांमध्ये आपल्या आपल्या समूहाबद्दल सदभावना आहेत.

UPSC: इंटरव्यू में पूछा हिंदू-मुस्लिम में किसका देंगी साथ? इस जवाब से सेलेक्ट

या उत्तरावर समोर बसलेल्या अधिकाऱ्यांकडून त्यांना अजून एक प्रश्न विचारण्यात आला, तुम्ही म्हणालात की समाजात सर्व जण सहिष्णुतेने राहतात परंतु याच्याशी मी सहमत नाही कारण आजकाल अनेक दंगली होत असतात छोट्या छोट्या तणावावरून लोक उत्तेजित होतात यावरूनच त्यांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला तुम्ही वेगवेगळ्या वेळेत कार्यक्रम करण्याचे सांगितले मात्र समजा एक समूह म्हंटला की आम्ही वेळ बदलणार नाही मग अशा वेळेस तुम्ही काय कराल ?

त्यावर साक्षि यांनी उत्तर दिले की जर मी जिल्हा न्यायदंडाधिकारी आहे तर मी त्या दोघांनाही विरोध करू शकते तसा मला अधिकार देखील आहे त्यामुळे मी आधी दोनीही समुदायाच्या नेतृत्वांपुढे वेगवेगळ्या वेळांचा प्रस्ताव ठेवेल मात्र कोणीही ऐकले नाही तर मी दोघांच्याही परवानग्या नाकारेल.

यावर त्यांना पुन्हा प्रश्न केला गेला समजा त्यातील एका समूहाचा व्यक्ती हा स्थानिक आमदाराचा भाऊ आहे आणि ज्याचे सरकारमध्ये खूप वजन देखील आहे आणि तुम्ही स्वतः त्यांना ओळखता आणि त्या दिवशी सर्व जनता त्याच्या सोबत आहे तर मग तुम्ही काय कराल ?

यावर साक्षि यांनी उत्तर दिले की, जरी मी त्या आमदारांना खाजगीमध्ये ओळखत असले तरी जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून मी कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करेल जर त्यांनी माझे ऐकले तरच त्यांना परवानगी मिळेल नाहीतर त्यांना कार्यक्रमासाठी परवानगी देणार नाही.

पुन्हा एकदा त्यांना प्रति प्रश्न विचारला गेला ठीक आहे परंतु जर तुमच्यापेक्षा दहा वर्षांनी अनुभवी असलेल्या आयुक्तांनी तुम्हाला त्यांना परवानगी देण्यास सांगितले आणि दुसऱ्या गटाची परवानगी नाकारल्यास सांगितली तर मग तुम्ही काय कराल ?

त्यावर साक्षि यांनी उत्तर दिले की, मी त्यांच्या कडून याबाबत लेखी घेईल आणि हे देखील स्पष्ट करेल की जर भविष्यात धार्मिक तणाव वाढला तर त्याची जबाबदारी माझी नसेल.

त्यानंतर त्यांना पुन्हा विचारण्यात आले की आयुक्तांच्या फीडबॅकवरून तुमची बढती होणार की नाही हे ठरत असते त्यामुळे तुम्ही लेखी मागितले तर याचा परिणाम तुमच्या बढतीवर होऊ शकतो. मग काय कराल ?

यावर स्पष्ट उत्तर देताना साक्षी यांनी सांगितले की मी त्यांच्याकडून लेखी स्वरूपात लिहून घेईल आणि या प्रकारचा राजकीय दबाव येत राहील म्हणून मी मनमानी कारभार करणार नाही आणि बढती हि मला माझ्या कामामुळे मिळेल ना की कोणाच्या शिफारशीने.

युपीएससी साठीच्या अर्जावर तुम्हाला आपली आवड निवड देखील लिहावी लागते साक्षी यांनी यामध्ये घुमर डान्स असे लिहिले होते आणि त्यांना त्यावरून देखील प्रश्न विचारण्यात आले मात्र साक्षि यांनी त्याला देखील सडेतोड उत्तर दिले. त्यांनी सांगितले की या नृत्य प्रकारामध्ये पारंपरिक वेष भुषा असते आणि विशेष प्रकारची गाणी देखील असतात. या नृत्याची सुरुवात कोठे झाली असे विचारल्यावर साक्षी यांनी राजस्थानात याची सुरुवात झाली असून त्याबाबतच्या अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या.