Salary Hike | सॅलरी देण्यामध्ये ‘हे’ देश आहेत सर्वात पुढे; भारताचा क्रमांक अगदी खाली

पोलीसनामा ऑनलाइन – Salary Hike | आपल्याकडे नोकदार वर्ग (Working Class) मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहे. नोकरी करुन महिन्याला सॅलरी (Monthly Salary) घेणाऱ्या लोकांची जास्त संख्या आपल्या देशामध्ये आहे. असे असले तरी जागतिक स्तरावर दिल्या जाणाऱ्या मासिक वेतन प्रमाणाच्या यादीमध्ये आपल्या देशाचा (Salary In India) खूप खाली क्रमांक आहे. अनेक देश हे मासिक वेतन अर्थात सॅलरी देण्यामध्ये खूप पुढे आहे. या देशामध्ये चांगली सॅलरी दिली जाते. आज आपण असे काही देश जाणून घेऊया ज्यामध्ये चांगली सॅलरी (Higher Salary Country) दिली जाते. (Salary Hike)

World of Statistics च्या म्हणण्यानूसार अनेक असे देश आहेत जे भारतापेक्षा जास्त सॅलरी ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना देतात. या प्रमाणे देशांना क्रमांक देखील देण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर युरोपातील ‘स्वित्झर्लंड’ (Switzerland) हा देश आहे. स्वित्झर्लंडमध्ये एका कर्मचाऱ्याला सरासरी पगार सुमारे 6298 डॉलर म्हणजे भारताच्या रुपयांमध्ये तब्बल 523,714 रुपये आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ‘लक्झेंबर्ग’ (Luxembourg) आहे. तिथे सरासरी मासिक पगार 5122 डॉलर आहे. यानंतर सुप्रसिद्ध ‘सिंगापूर’ (Singapore) हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे सरासरी 4990 डॉलर मासिक वेतन आहे.

जागतिक स्तरावर महासत्ता म्हणून गाजत असलेले ‘अमेरिका’ (United States) यामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेमध्ये कर्मचाऱ्यांना सरासरी मासिक पगार 4664 डॉलर दिला जातो. यामध्ये पाचव्या क्रमांकावर ‘आइसलँड’चे (Iceland) नाव येते. आइसलँडचा मासिक पगार 4383 डॉलर आहे. तर ‘कतार’मध्ये (Qatar) सरासरी मासिक पगार 4147 डॉलर आहे. ‘नेदरलँड’चे (Netherland) नाव आठव्या क्रमांकावर आहे, जिथे सरासरी मासिक वेतन 3550 आहे. या यादीमध्ये भारताचे नाव फार खाली आहे.

आपल्या देशामध्ये सर्वात जास्त तरुणवर्ग आहे. आणि अनेक लोक हे महिन्याच्या पगारावर आधारित आहेत. आपल्याकडे लोक महिन्याला मिळणाऱ्या सॅलरीमधून त्यांची गरजा भागवतात. मात्र आपल्या इथे मिळणारा पगार हा इतर देशापेक्षा फारच अल्प आहे. या यादीमध्ये भारताचा क्रमांक 64 व्या स्थानावर आहे. एवढ्या खाली भारताचा नंबर असून इतर देशांपेक्षा आपल्याकडे फार कमी सॅलरी (Salary In India) दिली जाते ही वस्तूस्थिती आहे. भारतामध्ये एका कर्माचाऱ्याचा मासिक पगार सरासरी 594 डॉलर आहे. अशा परिस्थितीत टॉप 10 देशांच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी भारताला खूप मेहनत करावी लागणार आहे. मात्र जर तुम्हांला जास्त सॅलरी हवी असेल तर तुम्ही यादीतील पहिल्या 10 देशांमध्ये नक्कीच कामासाठी जाऊ शकता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bank Loan Interest Rates Hike | बॅंकेचे कर्ज आणखी महागले; आता भरावा लागणारा जास्तीचा EMI