आता शिक्षकांची पगार’वाढ’ विद्यार्थ्यांच्या निकालावर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इथून पुढे शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक निकालावरच शिक्षकांची पगारवाढ ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रात मागच्या १२ व २४ वर्षांपासून सेवेत रुजू असलेल्या शिक्षकांचा समावेश असणार आहे. वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या मागील तीन वर्षांतील वर्गांचा निकाल तपासण्याचे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या आदेशामुळे शिक्षकवर्गात संतापाची चांगलीच लाट पसरली आहे.

मोठ्या शहराच्या तुलनेत राज्यातील ग्रामीण भागात शाळांचा निकाल कमी लागतो. यामुळे शाळेतील शिक्षकांची पात्रता असूनही ते पगारवाढीला मुकणार असल्याची भीती वर्तविली जात आहे. शालेय परीक्षांचा निकाल हा केवळ शिक्षकांवर अवलंबून नसून इतर बाह्य घटकही त्याला कारणीभूत असतात.

अभ्यासक्रम एकसारखा असला तरी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरांच्या तुलनेत दुर्गम खेडी, आदिवासी भागातील शाळांचा निकाल तुलनेत कमी लागतो. ज्या शाळांचा निकाल कमी लागला आहे, त्या शाळेतील शिक्षकाची पात्रता असूनही १२ किंवा २४ वर्षांच्या सेवेनंतर त्यांना पगारवाढ नाकारणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी केला विचारला आहे.

आता वेतनश्रेणी लागू होण्यासाठी अगोदरचीच पद्धत
ज्या शिक्षकांची १२ किंवा २४ वर्षे सेवा झाली आहे. असे शिक्षक निवड आणि वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी अर्ज करत असतात. या शिक्षकांना पुणे येथील यशदा या शासनाच्या संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात अभ्यासक्रम बदल, तो शिकविण्याची आधुनिक पद्धत, नवीन तंत्रज्ञानाची माहिती, चाईल्ड सायकोलॉजी विषयी मार्गदर्शन केले जाते. या प्रशिक्षणानंतर त्या शिक्षकांना निवड किंवा वरिष्ठ वेतनश्रेणी लागू केली जात होती.

वरिष्ठ व निवडश्रेणी लागू असलेल्या शिक्षकांचा शाळेतील मागील तीन वर्षांचा निकाल तपासण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर जिह्यातील २५ शिक्षकांच्या कामगिरीचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल ३१ ऑगस्टपर्यंत परिषदेकडे सादर करावयाचे आहे.

तसेच पगारवाढीसाठी प्रश्नावली, शिक्षक शिकवीत असलेली इयत्ता, विषय, शिक्षक शिकवीत असलेल्या विषयाचा, आणि वर्गाचा मागच्या तीन वर्षांतील निकाल (वर्ष २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९) वरिष्ठ, निवडश्रेणी लागू घेण्यासाठी शिक्षकांच्या कामगिरीवर अधिकाऱ्याचे मत ठरेल.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like