Saleem Malik-Wasim Akram | ‘तो’ मला नोकराप्रमाणे वागवायचा; पाकिस्तानच्या माजी कॅप्टनवर वसिम अक्रम यांचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Saleem Malik-Wasim Akram | क्रिकेटमध्ये ‘स्विंगचा सुलतान’ म्हणून अशी ज्याची ओळख आहे असा पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वसीम अक्रमने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. त्याने त्याचा सहकारी खेळाडू सलीम मलिकवर धक्कादायक आरोप केले आहेत. सलीम मलिक आपल्याला नोकराप्रमाणे वागणूक द्यायचा, असा आरोप वसीम अक्रमने केला आहे. अक्रमने त्याच्या ‘सुल्तान: अ मेमॉर’ या बायोग्राफीमध्ये या गोष्टींचा खुलासा केला आहे. मलिकने पाकिस्तान क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर दोन वर्षांनी वसीम अक्रमने पाकिस्तान क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. (Saleem Malik-Wasim Akram)

 

काय म्हणाला अक्रम?
सलीम मलिक हा मी ज्युनिअर असल्याचा गैरफायदा घेत असत. ते निगेटिव्ह आणि स्वार्थी होते आणि माझ्याशी एका नोकराप्रमाणे वागायचे. मी त्यांना मसाज करावा, असंही ते म्हणाले होते. त्यांनी मला त्यांचे कपडे आणि बूट धुवायला सांगितलं होतं. त्यावेळी टीममध्ये रमीझ, ताहिर, मोहसीन, शोएब मोहम्मद हे तरूण क्रिकेटर होते. त्यांच्यसोबत मी नाईट क्लबमध्ये जायचो. तेव्हा सलीम मलिकचा मला खूप राग यायचा,” असा खुलासा अक्रमने आपल्या ‘सुल्तान: अ मेमॉर’ या बायोग्राफीमध्ये केला आहे. (Saleem Malik-Wasim Akram)

वसीम अक्रम यांची कारकीर्द
वसीम अक्रमने 1984 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाकडून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वसीम अक्रमने पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी 356 वन-डे मॅचेसमध्ये 502 विकेट घेतल्या आहेत. तर, पाकिस्तानकडून 104 टेस्ट मॅचेमध्ये 414 विकेट घेतल्या होत्या. वसीम अक्रम 1992-1995 मध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन राहिला होता. पाकिस्तानने त्याच्या नेतृत्वात 2 पैकी 7 टेस्ट आणि 34 पैकी 21 वन-डे मॅचेस जिंकल्या होत्या.

 

सलिम मलिकला 2000 साली मॅच फिक्सिंगमध्ये दोषी ठरवण्यात आले. यानंतर त्याच्यावर क्रिकेट खेळण्यास आजीवन बंदी घालण्यात आली.
अक्रम कॅप्टन असताना आपल्याशी बोलणं टाळत होता, असा दावा सलिम मलिककडून करण्यात आला होता.
त्यामुळे आता वसीम अक्रमने केलेल्या आरोपांवर सलिम मलिक काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- Saleem Malik-Wasim Akram | saleem malik treated me like servant in my early days reveals wasim akram

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Prathamesh Parab | प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘त्या’ मैत्रिणीने केलेली पोस्ट चर्चेत

Riteish Deshmukh Ved | ‘वेड’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट 30 डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

Pune Rickshaw Strike | ‘बोल बच्चन अधिकारी’ म्हणत संतप्त रिक्षा चालकांचे RTO अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत