‘भाईजान’ सलमानच्या ‘दबंग 3’च्या ट्रेलरमध्ये ‘ही’ चूक, नेटीझन्सने केलं ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सलमान खानच्या दबंग 3 या आगामी सिनेमाची सध्या खूप चर्चा सुरू आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आगे. रिलीजनंतर कौतुक मिळवणारा ट्रेलर नंतर ट्रोल होताना दिसला. परंतु याबाबात ना ही सलमानला खबर होती आणि ना ही मेकर्सला. मेकर्सकडून झालेल्या एका चुकीने हा ट्रेलर सोशलवर ट्रोल होताना दिसला.

ट्रेलरमध्ये सिनेमाची रिलीज डेट देण्यात आली होती. यात डिसेंबरचे स्पेलिंग चुकले होते. लोकांनी ही चूक पाहिल्यानंतर त्यांनी सलमानलाच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. ही एकदमच सिली मिस्टेक होती. लोकांनी यात झालेली चूक स्क्रीनशॉट केली आणि तो स्क्रीनशॉट सोशलवर व्हायरल करण्यास सुरुवात केली.

एका युजरने म्हटले की, “आधीच फिजिक्स बर्बाद केलं आणि आता इंग्रजीची वेळ आहे…DECEMEBER. भाई तू महान आहेस.” आणखी एकाने म्हटले की, “इंग्रजीला माझी श्रद्धांजली.” आणखी एक युजर म्हटला, “दबंग 3 च्या टीमच्या निष्काळजीपणाची हद.”

image.png

दबंग 3 सिनेमाबाबत बोलायचे झाले तर अभिनेते महेश मांजरेकरची मुलगी सई मांजरेकर या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या सिनेमात सलमानसोबत सोनाक्षी सिन्हादेखील दिसणार आहे. 20 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा