#Video : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमानला वाटते ‘या’ गोष्टीची भीती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खानला एका गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट कोणती आहे ते तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा फिल्म समीक्षक म्हणजे क्रिटीक्स सलमानची स्तुती करतात तेव्हा त्याला भीती वाटते. कारण त्याची काम स्तुती बहुत करून फॅन्सच करत असतात जे फिल्म कलेक्शनमध्ये आपलं योगदान देत असतात.

मीडियाशी बोलताना सलमान खान म्हणतो की, “मला तेव्हा भीती वाटते जेव्हा क्रिटीक्स माझ्या कामाची प्रशंसा करतात. त्यांच्या विचाराशी माझे विचार किंवा प्रेक्षकांचे विचार जुळत नाहीत. त्यामुळे मी चकित झालो की, ते का माझ्या सिनेमाला स्टार्स देत आहेत किंवा त्याविषयी चांगलं लिहित आहेत.”

पुढे सलमान खान म्हणतो की, “सध्याच्या काळात मी जे सिनेमे केले आहेत ते यासाठी केले कारण मला त्यांची स्टोरी आवडली. जेव्हा एखादा सिनेमा करतो तेव्हा त्याचेही काही निकष असतात. मला असं वाटतं की, लोकांनी थिएटरमध्ये यावं आणि जेव्हा ते थिएटरच्या बाहेर पडतील तेव्हा त्यांनी त्यांचं दु:ख विसरावं आणि आनंदाने ते बाहेर पडावेत. हिरोइज्मच्या भावना, चांगला माणूस बनण्याच्या भावना घेऊन त्यांनी थिएटरच्या बाहेर पडावं.

बजरंगी भाईजान, सुल्तान अशा सिनेमांची क्रीटीक्सने प्रशंसा केल्यानंतर सलमान म्हणतो की, “जरी मी सिनेमांतून काही संदेश देत असेल तर यासाठी मी मोठं भाषण नाही देऊ शकत. कारण ते खूप बोरींग होतं. मग त्यात काही फन किंवा एन्टरटेंमेंट नसतं.”

तुमचा सर्वात मोठा समीक्षक कोण आहे असे विचारल्यानंतर सलमान म्हणतो की, “माझे वडिल माझ्या कामाचे सर्वात मोठे क्रीटक आहेत. ते म्हणतात की, आता विसर… चल झोप… सिनेमा खूप हिट आहे. फक्त एवढंच ते कधीच माझ्या समोर येऊन माझी स्तुती नाही करत. मला कधीच त्यांच्याकडून स्तुती ऐकण्याची संधी मिळाली नाही. ते कधीतरीच म्हणतात, चांगल काम केलंस.”

याशिवाय भारत सिनेमाच्या यशाबाबत बोलताना सलमान म्हणतो की, “माझ्यासाठी माझ्या सगळ्याच सिनेमांचे यश महत्त्वपूर्ण आहेत. भारत एक असा सिनेमा आहे ज्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. हे माझ्या सगळ्याच सिनेमासोबत होतं. मी सिनेमामध्ये विश्वास ठेवतो. मी खूप खुश आहे कारण चाहत्यांना सिनेमा खूप भावत आहे मला त्याचे कौतुक आहे. खरेतर प्रेक्षकांनी सर्वांच्याच कामाचे कौतुक केले आहे. हे खरंच जबरदस्त आहे.”

सिनेजगत

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

..म्हणून अभिनेत्री ईशा गुप्‍ता भडकली ‘आधार कार्ड’च्या प्राधिकरणावर

Loading...
You might also like