‘इंशाअल्लाह’ ! २०२० ची ईदही सलमानने केली ‘BOOK’ ; ‘या’ अभिनेत्रींसोबत करणार ‘रोमान्स’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – प्रत्येक वेळी सलमान आपल्या चाहत्यांसाठी ईदच्या प्रसंगी चित्रपट प्रदर्शित करत असतो. यावेळी देखील त्याने त्याच्या चाहत्यांसाठी ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित केला होता. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने 43 कोटी रुपये कमावले. सलमानचा ‘भारत’ सगळ्यात मोठा चित्रपट म्हणून गाजला. अशी माहिती समोर आली आहे की, सलमान खानने २०२० ची ईद देखील बुक केली आहे. बॉलीवूड रिपोर्टनुसार, सलमानचा ‘इंशाअल्लाह’ चित्रपट २०२० ला ईदचा प्रसंगी प्रदर्शित होणार आहे. ‘इंशाअल्लाह’ चित्रपटाची अधिकृत घोषणा केली गेली आहे.

अशी माहिती आली आहे की, संजय लीला भंसालीचा हा चित्रपट २०२० ला ईदच्या प्रसंगी प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्टसाठी ही पहिलीचवेळ आहे की ती भंसाली आणि सलमान सोबत काम करणार आहे. रिपोर्ट्सच्या माहिती नुसार या चित्रपटासोबत रोहित शेट्टीचा चित्रपट सूर्यवंशी देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. याचा अर्थ असा होतो की, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या मध्ये ईदच्या प्रसंगी टक्कर होणार आहे. सूर्यवंशी चित्रपटाची शुटिंग चालू झाली आहे परंतु सलमानच्या चित्रपटाची शूटिंग आणखी देखील सुरु झाली नाही. असे अपेक्षित आहे की पद्धतीमध्ये बदलावं होऊ शकतो.