महेश मांजरेकरच्या मुलीसोबत होता ‘भाईजान’, फॅननं मध्येच ‘असं’ केल्यानं भडकला सलमान खान ! (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खान सध्या आपल्या आगामी सिनेमा दबंग 3 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर सलमान खानसोबत रोमँस करताना दिसणार आहे. नुकताच एक किस्सा समोर आला आहे ज्यात सलमान आणि सई मीडियाला पोज देत होते आणि चाहत्याच्या एका हरकती मुळे सलमान खान अचानक भडकला.

सलमान आणि सई नुकतेच रमेश तौरानी यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीला आले होते. यावेळी सई आणि सलमान मीडियाला पोज देत होते. अचानक एक चाहता सलमानच्या जवळपास अंगावरच गेला. त्याला सलमान सोबत सेल्फी घ्यायचा होता. परंतु सलमानच्या बॉडीगार्ड्सने लगेचच प्रकरण हाताळलं आणि चाहत्याला बाजूला केलं.

सध्या सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यानंतर अनेक नेटीझन्सने यावर आपली प्रतिक्रियाही दिली आहे. काहींनी सलमानची बाजू घेतली आहे तर काहींनी त्याच्यावर टीका केली आहे. काहींनी म्हटलंय, सलमान खान नेहमीच तोऱ्यात वावरतो. एकाने तर असंही म्हटलं की, ज्या चाहत्यांच्या जीवावर सलमान खान मोठा झाला आहे त्या चाहत्यांसोबत त्याने सौजन्याने वागायला हवे. एवढे संतापण्याचे काहीही कारण नाही.

दबंग 3 हा सिनेमा 2020 मध्ये ईदच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. या सिनेमाला घेऊन सलमान खानचे खानचे चाहतेही खूप उत्सुक दिसत आहेत.

View this post on Instagram

🥤🥤🥤

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

View this post on Instagram

the grass is always green on my side🎀

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

View this post on Instagram

fearlessly authentic🤞🏻 #saieemanjrekar

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

Visit : policenama.com

 

You might also like