प्रियंका सोबत काम करण्यास सलमानचा नकार 

मुंबई : वृत्तसंस्था – सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाला ऐनवेळी नकार देणं प्रियंका चोप्राला चांगलंच महागात पडलं आहे. सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची जोडी तब्बल १२ वर्षांनंतर एकत्र काम करतेय. भन्साळींच्या या आगामी चित्रपटात सलमान लीड रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सलमान सोबत मुख्य भूमिकेसाठी प्रियंका चोप्राला विचारण्यात आले आहे. पण सलमान खानला प्रियंका सोबत काम करण्याची अजिबात इच्छा नाही.

सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाला प्रियांकाने नकार दिला त्यामुळे ‘भारत’च्या अख्ख्या टीमला धक्का बसला होता. प्रियंकाच्या नकारानंतर मेकर्सला घाईघाईत कॅटरिना कैफला साईन करावे लागले होते.प्रियंकाचे हे अव्यावहारिक वागणं सलमानला अजिबात रुचलं नव्हतं. यानंतर प्रियांकाने सलमानचा राग घालवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला होता पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

भन्साळींनी नुकतंच ‘गंगुबाई’ या चित्रपटाच्या नावाची नोंदणी केली आहे. यामध्ये सलमान खानची मुख्य भूमिका आहे. तर नायिकेसाठी भन्साळींनी प्रियांका चोप्राचा विचार केला आहे. मात्र सलमानने तिच्यासोबत काम करण्यास साफ नकार दिला. प्रियंकाने दिलेला दगा सलमान अजूनही विसरला नाही. त्यामुळे प्रियंका सोबत पुन्हा काम करण्याची त्याची इच्छा नाही.