Salman Khan | सलमान खानने मुंबईत घेतले डुप्लेक्स घर; भाडे म्हणून द्यावे लागणार महिन्याला तब्बल ‘इतके’ लाख रुपये

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Salman Khan | बॉलिवडूमधील अनेक कलाकारांची मुंबईमध्ये आलिशान घरं आहेत. अमिताभ बच्चन (amitabh bachchan), शाहरुख खान (shah rukh khan), सलमान खान (Salman Khan) यांचे घर एखादा राजमहाला प्रमाणेच आहे. त्याला जबरदस्त प्रसिद्धीही मिळाली आहे. सलमान खानने नुकतंच एक डुप्लेक्स घर भाड्याने घेतल्याचे समोर आलं आहे. एका कामानिमित्त त्यानं हे घर भाडेतत्त्वावर घेतले असून महिन्याकाठी त्याला आठ लाख २५ हजार रुपयांच भाडं मोजावे लागणार आहे.

वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये (galaxy apartment bandra) सलमान खान आपल्या कुटुंबासह राहतो. तसेच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी त्याच्या मालमत्ता असतानाही त्याने हा ड्युप्लेक्स फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतला आहे. वांद्रे येथील घरापासून अगदी जवळच हा फ्लॅट असून काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी (congress leader baba siddique) आणि झिशान सिद्दिकी यांच्या मालकीचा हा फ्लॅट आहे. सिद्दकी आणि खान कुटुंबीयांचे जवळचे संबंध असून अनेकदा हे दोन्ही कुटुंबीय अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले आहेत. सलमानने ११ महिन्यांसाठी दोन हजार २६५ चौरस फूट कार्पेट एरिया असलेली मालमत्ता भाड्याने घेतली आहे. कंपनीसाठी काम करणाऱ्या लेखकांसाठी या मालमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. सलमान खान (Salman Khan) व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने (Ventures Pvt) वांद्रेतील मकबा हाइट्सच्या १७ व्या आणि १८ व्या मजल्यावरील डुप्लेक्ससाठी भाडे कराराचं नुतनीकरण केल्याचे एका रिअल इस्टेट पोर्टलने म्हंटले आहे.

Pune News | दीपावलीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे आदेश

सलमान खानच्या ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ची प्रदर्शनापूर्वीच धूम

महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांनी दिग्दर्शन केलेला ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट २६ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
या चित्रपटामध्ये तो पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटात सलमानचा मेहूणा आयुष शर्मादेखील गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ तसेच जॉन अब्राहमच्या सत्यमेत जयते २ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहे.

सलमान खान सध्या कॅटरिना कैफसोबत (katrina kaif) टायगर 3 च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
२०२२ मध्ये हा चित्रपट रिलीज होणार असून त्याचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलं आहे.
याशिवाय ‘कभी ईद कभी दिवाली’ आणि ‘किक २’ हे चित्रपट देखील सलमानच्या हातात आहेत.
यासोबतच शाहरुख खानच्या ‘पठान’ चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार असून यामध्ये सलमान कॅमियो करणार आहे.

हे देखील वाचा

PM Kisan Yojana | ‘या’ तारखेला जमा होईल PM Kisan चा 10 हप्ता, जाणून घ्या रजिस्ट्रेशन करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

EPFO | पीएफ कर्मचार्‍यांसाठी लवकरच खुशखबर ! अकाऊंटमध्ये येणार मोठी रक्कम, जाणून घ्या

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Salman Khan | salman khan pays rent of rs 8 25 lakhs monthly for galaxy apartment bandra duplex

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update